coronavirus : विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 01:27 PM2020-04-13T13:27:47+5:302020-04-13T13:28:29+5:30

महावितरणच्या अधिकारी व कर्मचारीवर अखंडित वीजपुरवठा  करण्यासोबतच आणखी एक महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे; विलगीकरण कक्षाच्या  विद्युतीकरणाची.

coronavirus: electrification of the separation cell | coronavirus : विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

coronavirus : विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

Next

 

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्मभूमीवर,  राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात,  महावितरणच्या अधिकारी व कर्मचारीवर अखंडित वीजपुरवठा  करण्यासोबतच आणखी एक महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे; विलगीकरण कक्षाच्या  विद्युतीकरणाची. महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत मुलुंड,  खारघर, पनवेल ग्रामीण व पनवेल शहर विभागात विलगीकरण कक्ष म्हणून सरकारने निवडलेल्या काही इमारतींचे विद्युतीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले असून खारघरमधील आणखी एक इमारतीचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
 
खारघर येथील श्री सत्य साई  हेल्थ अँड एडुकेशन ट्रस्ट , सेक्टर ३८ या रुग्णालयाचे विलगीकरण कक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.   या विलगीकरण कक्षासाठी  उच्च दाब वीजपुरवठा सुरु करणे आवश्यक होते. त्यासाठी  वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता आर बी माने, तसेच उपकार्यकारी अभियंता चक्रवर्ती यांचे निर्देनुसार, सिडकोने त्यांचे  प्रलंबित काम कुरकुरे यांच्या देखरेखीखाली विश्वा इलेक्ट्रिकल, तसेच ग्राहकांतर्फे प्रगती इलेक्ट्रिकल यांनी एका आठवड्यात पूर्ण केले. सर्व तांत्रिकबाबी पूर्ण झाल्यानंतर   पनवेल शहर विभागाचे  कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्या देखरेखीखाली आर जे पाटील, शकील अहमद व त्या शाखेतील  जनमित्र यांन  परिश्रम करून सदर काम एका आठवड्यात  युद्धपातळीवर  पूर्ण केले. या इमारतीत ५०० केडब्लूचे    वीजभार  सुरु करण्यात आले. याकामी आर जे पाटील, निलाखे,  शकील अहमद, समशेट्टे, सहाय्यक अभियंता शिवाजी पाटील सहभागी झाले होते.

दरम्यान, यापूर्वी मुलुंड विभागाअंतर्गत मिठानगर मार्ग उच्च प्राथमिक मनपा शाळा मुलुंड पूर्व येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत विलगीकरण कक्षासाठी महावितरणतर्फे २०० मीटरची लघुदाब वाहिनी टाकून नवीन वीज जोडणी देण्यात आली होती. या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी, अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी अविरत प्रयत्न करीत आहेत. त्यासोबतच, वेळोवेळी येत असलेल्या या विलगीकरण कक्षासाठी  वीज जोडणीचा गरजांकडेही महावितरण तातडीने  लक्ष देत विजेची  पूर्तता करत आहे.  महावितरणच्या मुलुंड विभागाने नुकतेच विलगीकरण कक्षासाठी दोन  दिवसात ४०० वीज मीटर लावले होते. पुन्हा,  या  विभागातर्फे  मुलुंड पूर्व मनपा उच्च प्राथमिक  शाळासाठी नव्याने वीज जोडणी देण्यात आली आहे.

 

Web Title: coronavirus: electrification of the separation cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.