मुंबई : अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाºया कर्मचारी-अधिकाºयांना कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालिकेने प्रवेश नाकारला आहे. या कर्मचाºयांच्या राहण्याची व्यवस्था होईपर्यंत तूर्तास हा आदेश स्थगित केला आहे. मात्र मुंबई पालिकेने कोरोना मोहिमेत काम करणाºया कर्मचारी-अधिकाºयांची जबाबदारी उचलली आहे. त्यानुसार मुंबईबाहेर राहणाºया अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांची राहण्याची व जेवणाची सोय हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.
लॉकडाउन काळात आपत्कालीन कक्ष, जल अभियंता, सुरक्षा व वैद्यकीय कर्मचाºयांना दररोज कामावर यावे लागते. मात्र यापैकी बहुतांशी कर्मचारी ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई येथे राहतात. त्यांना कामावर पोहोचण्यात अडचणी येत आहेत. तसेच प्रवासादरम्यान संबंधित डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबईतच राहण्याची व्यवस्था करावी,अशी सूचना मुंबईच्या हद्दीबाहेरील पालिकांनी केली होती. त्यानुसार सर्व २४ विभागांच्या साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रातील हॉटेल्सची श्रेणीनिहाय यादी करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.अशी मिळणार सुविधापंचतारांकित हॉटेल्ससाठी प्रति दिवस दोन हजार, चार तारांकित हॉटेलसाठी प्रतिदिन एक हजार ५००, तीन तारांकित हॉटेल असल्यास दर दिवशी एक हजार तर विना तारांकित हॉटेल असल्यास प्रतिदिवशी पाचशे रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पालिका मुख्यालय, ‘हॉट स्पॉट’मध्ये ५० टक्केच हजेरी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे कर्मचाºयांची शंभर टक्के उपस्थिती पालिका प्रशासनाने सक्तीची केली होती. मात्र कर्मचाºयांची होणारी गैरसोय, गर्दी आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या संदर्भातील परिपत्रकात आता सुधारणाकरण्यात आली आहे. त्यामुळे पालिका मुख्यालय आणि कोरोनाचा धोका अधिक असलेल्या भागात कर्मचाºयांची उपस्थिती पुन्हा ५०टक्केच करण्यात आली आहे.