Join us

coronavirus: अतिवृष्टीमुळे कोरोनाचा धोका वाढणार नाही - तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 4:07 AM

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही.

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने ८३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात आता हवामान विभागाने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पावसामुळे कोरोनाचा धोका वाढणार का, असा सवाल मुंबईकरांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे, मात्र आता वैद्यकीय तज्ज्ञांनी या पावसामुळे कोरोनाचा धोका वाढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपाऊसआरोग्य