Coronavirus : लॉकडाऊनमध्येही मुलाला भेटण्याची वडिलांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 01:26 AM2020-04-29T01:26:05+5:302020-04-29T01:27:20+5:30

उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत दोघांनाही समजुतीने प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला. मुलांना भेटता यावे, यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली.

Coronavirus : The father is allowed to meet the child even in lockdown | Coronavirus : लॉकडाऊनमध्येही मुलाला भेटण्याची वडिलांना परवानगी

Coronavirus : लॉकडाऊनमध्येही मुलाला भेटण्याची वडिलांना परवानगी

Next

मुंबई : वडील मुलांच्या भेटीमध्ये लॉकडाऊन अडथळा ठरू नये, असे म्हणत उच्च न्यायालयाने एका महिलेला तिच्या दोन मुलांना त्यांच्या वडिलांना पाहता यावे, यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. महिलेने दाखल केलेल्या वैवाहिक वादासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्या. एस.जे. काथावाला यांना सांगण्यात आले की, कौटुंबिक न्यायालयाने दोन्ही मुलांचा ताबा त्यांच्या आईकडे दिला. वडिलांना भेटण्याची परवानगी दिली. मात्र आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेने पतीविरुद्ध अवमान याचिका दाखल केली, परिणामी पतीला मुलांना भेटता येईना.
त्यामुळे पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत दोघांनाही समजुतीने प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला. मुलांना भेटता यावे, यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली.
त्यावर न्यायालयाने महिलेला तिच्या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांना भेटता यावे, यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. सोमवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी मुले सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या वडिलांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भेटतील व संवाद साधतील आणि ही व्यवस्था लॉकडाउन हटविण्यात येईपर्यंत करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
।न्यायालयात विनंती
२४ एप्रिल रोजी पतीने मुलांना भेटता यावे यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. लॉकडाउनमुळे आपण मुलांना भेटू शकत नाही. मुलांना भेटता यावे, यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली.

Web Title: Coronavirus : The father is allowed to meet the child even in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.