Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:52 AM2020-03-21T03:52:18+5:302020-03-21T03:53:21+5:30

उबेर चालकाला कोरोना झाल्यामुळे प्रवासी ओला-उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत आहेत. एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल, तर त्यापासून आपल्याला होऊ शकतो, अशी सर्वांमध्ये भीती आहे.

Coronavirus : Fear and anxiety among the OLA & UBER drivers | Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही

Coronavirus : ओला-उबर चालकांमध्ये भीती तसेच चिंताही

Next

मुंबई : कोरोनामुळे मुंबईत परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली, तसेच एका चालकाला कोरोनाची लागण झाली़ त्यामुळे ओला-उबर चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे गाडीच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता आहे.
उबरचालक तुकाराम रौधळ म्हणाले, ‘उबेर चालकाला कोरोना झाल्यामुळे प्रवासी ओला-उबर टॅक्सीमध्ये बसण्याचे टाळत आहेत. एखाद्या प्रवाशाला कोरोना असेल, तर त्यापासून आपल्याला होऊ शकतो, अशी सर्वांमध्ये भीती आहे. आम्ही चार दिवस पूर्णपणे गाड्या बंद ठेवल्या आहेत.’ राष्ट्रीय कामगार संघाच्या वाहतूक विभागाचे प्रमुख सुनील बोरकर म्हणाले की, जानेवारीपासून ओला-उबर चालकांचे भाडे कमी झाले आहे. त्यांचा दैनंदिन खर्च यावरच चालतो, परंतु आता ओला-उबर पूर्णपणे बंद झाले आहे. अजून किती दिवस बंद राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होते आहे. दैनंदिन खर्च कसा भागवायचा, गाडीच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता आहे. शेतकऱ्यांप्रमाणे ओला-उबर चालकांना कर्जमाफी द्यावी, अशी आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत.

Web Title: Coronavirus : Fear and anxiety among the OLA & UBER drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.