- मनोहर कुंभेजकरदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि सुमारे 1 कोटी 60 लाख देशात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराचे महापौर म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या मुंबईच्या महिला माजी महापौर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरसावल्या आहेत.
आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीत एक लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांशी थेट संबध असल्याने आमच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत प्रशासकीय, आपत्कालीन यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याचा दांडगा अनुभव आमच्याकडेे आहे. व्हायरल फिव्हर, कॉलरा आणि अन्य आलेल्या साथीच्या रोगांमध्ये आणि आपत्कालीनजन्य परिस्थितीत मुंबईच्या महापौर म्हणून त्यांनी आम्ही प्रभावी कामगिरी केली आहे.
त्यामुळे आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीतल्या अनुभवाचा फायदा देण्यासाठी आम्ही सज्ज असून, आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा यशस्वी मुकाबला करू शकू असा विश्वास मुंबईच्या माजी महापौर ऍड. निर्मला सामंत-प्रभावळकर(9820030584), माजी महापौर विशाखा राऊत(9821123801), माजी महापौर डॉ.शुभा राऊळ(8879997007) यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे विशाखा राऊत या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या देखील आहेत. मुंबईच्या या महिला त्रिकूट माजी महापौरांच्यावतीने त्यांची भूमिका ऍड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी खास लोकमतशी बोलताना स्पष्ट केली.
कोरोनाच्या सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सुमारे 22 ते 24 तास दिवस-रात्र कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी त्यांनी अनेक प्रभावी यंत्रणा राबवत आहेत.त्यामुळे एक खारीचा वाटा म्हणून आणि कोरोना युद्धजन्य परिस्थितीचा या मुंबई शहरातील सैनिक म्हणून आम्ही या तिघी महिला महापौर आमचे योगदान आणि असलेला दांडगा अनुभव महापालिका आणि राज्य शासनाला देण्यास तयार असल्याचे अँड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी शेवटी सांगितले.