Coronavirus: 'या' चार वयोगटातील रुग्णसंख्येने पार केला लाखांचा टप्पा; कोरोनाचा विळखा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:20 AM2020-08-28T01:20:07+5:302020-08-28T01:20:22+5:30
एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ६१ टक्के असून महिला रुग्णांचे प्रमाण ३९ टक्के आहे. अतिजोखमीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ७० टक्के असून अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ३० टक्के आहे.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्ण निदानात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे राज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या २८ हजार ३६० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.
११ ते २० वयोगटातील ५० हजार ५२३ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत बाधित बालकांचे प्रमाण ४.३ टक्के असून प्रौढ रुग्णांचे प्रमाण ७.१८ टक्के आहे. चार वयोगटातील रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा पार केला़ राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ३१ ते ४० वयोगटात सर्वाधिक रुग्ण असल्याची नोंद झाली आहे, ही रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ३३३ इतकी आहे, या रुग्णसंख्येचे प्रमाण २१.०७ टक्के आहे. ४१ ते ५० वयोगटातील १ लाख २५ हजार २३ रुग्णसंख्या असून एकूण रुग्णसंख्येत याचे प्रमाण १७.७६ टक्के आहे. ५१ ते ६० वयोगटातील १ लाख १२ हजार ५९१ रुग्ण असून २१ ते ३० वयोगटातील १ लाख २३ हजार ५ रुग्ण आहेत. राज्यात ६१ ते ७० वयोगटातील ७२ हजार ४६१ रुग्ण, ७१ ते ८० वयोगटातील ३३ हजार २८२ रुग्ण, ८१ ते ९० वयोगटातील ९ हजार ३०२ रुग्ण आणि ९१ ते १०० वयोगटातील १ हजार १५६ कोरोना रुग्ण आहेत.
एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ६१ टक्के असून महिला रुग्णांचे प्रमाण ३९ टक्के आहे. अतिजोखमीच्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ७० टक्के असून अन्य कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ३० टक्के आहे. राज्यात झालेल्या कोरोना मृत्यूंमध्ये ६५ टक्के प्रमाण पुरुष रुग्णांचे असून ३५ टक्के प्रमाण महिला रुग्णांचे आहे. राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत ३१ ते ४० वयोगटात सर्वाधिक रुग्ण असल्याची नोंद झाली आहे, ही रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ३३३ इतकी आहे, या रुग्णंख्येचे प्रमाण २१.०७ टक्के आहे. ४१ ते ५० वयोगटातील १ लाख २५ हजार २३ रुग्णसंख्या आहे़