मुंबई : लॉकडाउनमुळे राज्यभरात अडकलेले मजूर, कामगार, विद्यार्थी, मजूर, पर्यटक, नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सुरू करण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत एका बसमधून २२ प्रवाशांचा प्रवास होणार आहे.आॅनलाइन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. ते सोमवारपासून सुरू होईल. ही मोफत सेवा फक्त तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन काळात म्हणजेच १८ मेपर्यंत लागू आहे. नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी २२ जणांचा गट तयार करावा लागेल. त्यानंतर प्रवाशांची संपूर्ण माहिती अर्जात भरायची आहेत.भरलेला अर्ज शहरी भागात पोलीस आयुक्तालयात तर ग्रामीण भागातील लोकांनी हा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे द्यायचा आहे. ज्या जिल्ह्यात ते जाणार आहेत, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी त्यास परवानगी देतील.हेल्पलाइन उपलब्धआगार दूरध्वनी क्रमांक पोर्टलला एका हेल्पलाइनद्वारे जोडले जातील. ज्यावर प्रवासी आपल्या शंका आणि त्यांची वैयक्तिक माहिती देऊ शकतात.मुंबईतील नियंत्रण कक्ष आगार दूरध्वनीविद्याविहार ०२२-२५१०११८२,मुंबई आगार ०२२-२३०७२३७१,परळ आगार ०२२-२४३०४६२०,कुर्ला नेहरूनगर आगार ०२२-२५५२२०७२, पनवेल आगार ०२२-२७४८२८४४ आणि उरण आगार ०२२-२७२२२४६६च्प्रवासाची एसटी बस कुठून आणि किती वाजता निघेल याची माहिती प्रवाशांना मोबाइलवर दिली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. कटेंनमेंट झोनव्यतिरिक्त कोणाला जायचे असेल, त्यांना जाता येणार आहे. परंतु थर्मल स्क्रीनिंग, तपासणी केल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
coronavirus: अडकलेल्या नागरिकांसाठी उद्यापासून मोफत एसटी, परिवहनमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 6:32 AM