coronavirus: हुंड्याच्या त्रासातून मुलीने आयुष्य संपविले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:21 AM2020-07-10T02:21:38+5:302020-07-10T02:22:00+5:30
मुलीला हुंड्यासाठी देण्यात येणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिंडोशी पोलिसात दाखल केल्याने जावयाला अटक करण्यात आली आहे.
मुंबई: भाजी सडकी, गळकी आणल्यावरून सासूसोबत ‘तू-तू,मैं-मंै’ झाल्यानंतर सुनेने गळफास घेत आयुष्य संपविल्याचे सासरच्यांकडून सांगण्यात आले होते. मुलीला हुंड्यासाठी देण्यात येणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिंडोशी पोलिसात दाखल केल्याने जावयाला अटक करण्यात आली आहे.
लतेश गडा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जो व्यवसायाने सीए असून दोन वर्षांपूर्वी त्याचे लग्न देवांशी या तरुणीसोबत झाले होते. गोरेगावच्या दिंडोशी परिसरात बुधवारी १ जुलै, २०२० रोजी रहेजा टिपको हाइट्स या ठिकाणी लतेशसोबत राहणाºया देवांशीने गळफास घेत आत्महत्या केली. खराब भाजी आणल्याने सासूसोबत तिची बाचाबाची झाली. यामुळे तिने स्वत:ला बेडरूममध्ये कोंडून घेत गळफास घेतला, असे गडा कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. देवांशीचे वडील त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना गडा कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी छळले जात असल्याची माहिती दिली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांचा आरोप होता, त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करत लतेशला अटक केल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले. गळफास घेतलेल्या अवस्थेतील देवांशीला लतेशने खाली उतरवत स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल
देवांशीचे वडील त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना गडा कुटुंबीयांकडून हुंड्यासाठी छळले जात असल्याची माहिती दिली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांचा आरोप होता, त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करत लतेशला अटक केल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांनी सांगितले.