CoronaVirus News: मुंबईची स्थिती सुधारतेय; चार मुद्दे सांगत आदित्य ठाकरेंनी दिली 'गुड न्यूज'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:24 PM2020-06-10T18:24:45+5:302020-06-10T18:26:06+5:30
CoronaVirus News: आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील कोरोनाबद्दलची आकडेवारी
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा पावणे तीन लाखांच्या पुढे गेला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे ९० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. देशातील ३० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं कालच ५० हजारांचा टप्पा ओलांडला. यावरुन विरोधक सातत्यानं ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी काही मुद्दे ट्विटरवरून शेअर केले आहेत.
आदित्य ठाकरेंनी मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दलची आकडेवारी ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे. 'मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग २४.५ वर गेला आहे. देशाच्या बाबतीत हीच सरासरी १६ इतकी आहे. मुंबईतील रुग्णांचा मृत्यूदर ३ टक्क्यांवर आला आहे. देशातील सरासरीदेखील जवळपास इतकीच आहे. मुंबईतील डिस्चार्ज रेट ४४ टक्के आहे. धारावीतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग ४२ दिवसांवर गेला आहे,' अशी आकडेवारी आदित्य यांनी दिली आहे.
The good news from Municipal Commissioner of @mybmc today:
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 10, 2020
As of yesterday,
1. Mumbai’s doubling rate was at 24.5 (national ave is 16)
2. Death Rate has lowered to 3% (almost at par with national ave)
3. Discharge rate is 44%
4. Dharavi doubling days at 42 days
मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या, रुग्णालयातील बेडची अपुरी संख्या यावरुन विरोधकांनी अनेकदा ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपा आमदार राम कदम, नितेश राणे, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर सातत्यानं टीका केली आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील वरळी कोळीवाड्यातील कोरोना रुग्णांची संख्यादेखील मध्यंतरी वाढली होती. त्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. यातील ४४,८५९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४२६३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३,२८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कालच ५० हजारांच्या पुढे गेला. सध्या २६,३९७ जणांवर उपचार सुरू असून २२,९४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १,७६० जणांना जीव गमवावा लागला आहे.
...तर पुन्हा कठोर लॉकडाऊन; 'पुनश्च हरीओम'चा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला इशारा
कोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा
अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला पाठिंबाः देवेंद्र फडणवीस
‘या’ तारखेपासून राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार; सूत्रांची माहिती