मुंबई: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा पावणे तीन लाखांच्या पुढे गेला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे ९० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. देशातील ३० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं कालच ५० हजारांचा टप्पा ओलांडला. यावरुन विरोधक सातत्यानं ठाकरे सरकारला लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी काही मुद्दे ट्विटरवरून शेअर केले आहेत.आदित्य ठाकरेंनी मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दलची आकडेवारी ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे. 'मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग २४.५ वर गेला आहे. देशाच्या बाबतीत हीच सरासरी १६ इतकी आहे. मुंबईतील रुग्णांचा मृत्यूदर ३ टक्क्यांवर आला आहे. देशातील सरासरीदेखील जवळपास इतकीच आहे. मुंबईतील डिस्चार्ज रेट ४४ टक्के आहे. धारावीतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग ४२ दिवसांवर गेला आहे,' अशी आकडेवारी आदित्य यांनी दिली आहे.
CoronaVirus News: मुंबईची स्थिती सुधारतेय; चार मुद्दे सांगत आदित्य ठाकरेंनी दिली 'गुड न्यूज'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:24 PM