coronavirus: मद्यप्रेमींना खूशखबर! आता दारू मिळणार ऑनलाइन, जिथे दुकाने बंद, तिथे मिळणार नाही  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:13 AM2020-05-13T07:13:51+5:302020-05-13T07:14:05+5:30

सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल.

coronavirus: Good news for alcoholics! Alcohol will no longer be available online, where shops are closed | coronavirus: मद्यप्रेमींना खूशखबर! आता दारू मिळणार ऑनलाइन, जिथे दुकाने बंद, तिथे मिळणार नाही  

coronavirus: मद्यप्रेमींना खूशखबर! आता दारू मिळणार ऑनलाइन, जिथे दुकाने बंद, तिथे मिळणार नाही  

Next

मुंबई -  दारू दुकानांवरील गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने आॅनलाईन दारूविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी सशर्त असून ज्या ठिकाणी दारूबंदी आहे आणि जिथे अद्याप दारूविक्रीला परवानगी नाही, अशा ठिकाणी ही आॅनलाईन मद्यसेवा मिळणार नाही. त्यामुळे मुंबईतील मद्यप्रेमींची प्रतीक्षा कायम असेल.
सुरुवातीला ग्राहकाने आपला मोबाईल नंबर व नाव नमूद करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा व पिन कोड नमूद करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या मद्य विक्री दुकानांची यादी दिसेल.

त्यापैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतरच ग्राहकास ई-टोकन मिळेल. सदर टोकनच्या आधारे ग्राहकास घरपोच दारू मिळेल. दारू घरपोच देण्यासाठी जी व्यक्ती जाईल, ती मास्कचा वापर करील. वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करील, याची दक्षता दुकानदाराने घ्यायची आहे.

अदारू दुकानांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्अ टाळण्यासाठी आॅनलाईन विक्रीचा पर्याय काढण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी यासंदर्भात आदेश काढला.  ज्या ग्राहकांना मद्य खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे.
 

Web Title: coronavirus: Good news for alcoholics! Alcohol will no longer be available online, where shops are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.