Join us

Coronavirus: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला; ३०० जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 9:06 PM

राज्यात आजपर्यंत ३०० कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले. तर दिवसभरात २८६ रुग्ण आढळले तर ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात अजून सहा ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा निर्माण होणार असल्याने राज्यातील प्रयोगशाळांची संख्या ३६ होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते.  

राज्यात आजपर्यंत ३०० कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले. तर दिवसभरात २८६ रुग्ण आढळले तर ७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार २०२ इतकी झाली आहे. आज मृत झालेल्यांपैकी ३ मुंबईचे तर पुण्यातील ४ रुग्ण आहेत. तसेच आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर ३ हजार २०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी साधलेल्या संवादातील मुद्दे :•    राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता तो नंतर तीन झाला आता सध्या सुमारे सहा दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल. •    राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ टक्के मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. •    कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठ तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत•    राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझॣटिव्ह आढळले आहेत. •    राज्यात सध्या शासकीय २१ आणि खासगी १५ चाचणी प्रयोगशाळा आहेत त्यात अजून सहा प्रयोगशाळांची भर पडून ही संख्या ३६ होईल.•    पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.•    राज्यात सध्या ३०० कोरोनाबाधीत बरे झले आहेत त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधीत रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितले आहे.•    केंद्र शासनाकडे राज्याने ८ लाख एन-९५ मास्कची मागणी केली असू त्यापैकी १ लाख मास्क उपलब्ध झाले आहेत, सुमारे ३० हजार पीपीई कीट उपलब्ध झाले आहेत. •    दिल्ली येथे मरकजसाठी राज्यातील जे तबलीगी बांधव गेले होते त्यातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० जण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.•    अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथीलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचे पालन केले जाईल. २० एप्रिल नंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: २०७३ (११७)ठाणे: १३ ठाणे मनपा: १०९ (३)नवी मुंबई मनपा: ६८ (३)कल्याण डोंबवली मनपा: ५० (२)उल्हासनगर मनपा: १भिवंडी निजामपूर मनपा: १मीरा भाईंदर मनपा: ५१ (२)पालघर: ५ (१)वसई विरार मनपा: ३४ (३)रायगड: ६ पनवेल मनपा: १२ (१)ठाणे मंडळ एकूण: २४२३ (१३२)नाशिक: ३नाशिक मनपा: ५मालेगाव मनपा:  ४० (२)अहमदनगर: १९ (१)अहमदनगर मनपा: ९धुळे: १ (१)धुळे मनपा: ०जळगाव: ०जळगाव मनपा: २ (१)नंदूरबार: ०नाशिक मंडळ एकूण: ७९ (५)पुणे: १६पुणे मनपा: ४१९ (४४)पिंपरी चिंचवड मनपा: ३८ (१)सोलापूर: ०सोलापूर मनपा: १२ (१)सातारा: ७ (२)पुणे मंडळ एकूण: ४९२ (४८)कोल्हापूर: ३कोल्हापूर मनपा: ३सांगली: २६सांगली मिरज कुपवाड मनपा:०सिंधुदुर्ग: १रत्नागिरी: ६ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ३९ (१)औरंगाबाद:०औरंगाबाद मनपा: २८ (२)जालना: २ हिंगोली: १ परभणी: ०परभणी मनपा: १औरंगाबाद मंडळ एकूण: ३२ (२)लातूर: ८लातूर मनपा: ०उस्मानाबाद: ३ बीड: १नांदेड: ०नांदेड मनपा: ०लातूर मंडळ एकूण: १२अकोला: ७ (१)अकोला मनपा: ७अमरावती: ०अमरावती मनपा: ५ (१)यवतमाळ: १३बुलढाणा: २१ (१)वाशिम: १ अकोला मंडळ एकूण: ५४ (३)नागपूर: १नागपूर मनपा: ५५ (१)वर्धा: ०भंडारा: ०गोंदिया: १चंद्रपूर: ०चंद्रपूर मनपा: ३गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: ६० (१)इतर राज्ये: ११ (२)एकूण:  ३२०२ (१९४)

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसराजेश टोपे