Coronavirus : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:19 PM2021-04-23T20:19:48+5:302021-04-23T20:21:43+5:30

Coronavirus In Mumbai : गुरूवारीही मुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या होती अधिक

Coronavirus Good news for Mumbaikars more than 9000 patients discharge from hospitals coronavirus | Coronavirus : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

Coronavirus : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देगुरूवारीही मुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या होती अधिककोरोनाचया पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात लावण्यात आलेत कडक निर्बंध

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ३ लाखांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. असं असलं तरी मुंबईतून आता थोडी दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारीदेखील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या चोवीस तासांत मुंबईत तब्बल ९५४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गेल्या चोवीस तासांत मुंबईत ७२२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ९५४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण ५ लाख २० हजार ६८४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.



मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर आला आहे. मुंबईत सध्या ८१ हजार ५३८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली.

Web Title: Coronavirus Good news for Mumbaikars more than 9000 patients discharge from hospitals coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.