coronavirus: मुंबईतील धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 06:48 PM2020-08-17T18:48:48+5:302020-08-17T18:50:52+5:30

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत शेख यांच्या दालनात आज दुपारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख यांनी दिली माहिती.

coronavirus: The government will soon take a decision to start religious places in Mumbai | coronavirus: मुंबईतील धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार  

coronavirus: मुंबईतील धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार  

Next

मुंबई : मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरु करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत शेख यांच्या दालनात आज दुपारी पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीला मिनारा मशिदीचे विश्वस्त मोहद असिफ मेमन, अब्दुल वहाब लतिफ, जामा मशिदीचे चेअरमन शोहेब खातिब, जामा मशिदीचे विश्वस्त नाजिर तुंगेकर, साबिर निरमन आदी मान्यवर उपस्थित होते.

एैतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली.

धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याचा सरकार गांभीर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Read in English

Web Title: coronavirus: The government will soon take a decision to start religious places in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.