Join us

coronavirus: हॉस्पिटलमधील गैरप्रकारांची राज्यपालांकडून दखल, दोषींवर कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 6:33 AM

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश राज्य सरकारला देण्याचे आश्वासन कोश्यारी यांनी गुरुवारी दिले.ग्लोबल हब येथील रुग्णालयात दाखल केलेले वृद्ध भालचंद्र गायकवाड बेपत्ता झाल्याचे रु ग्णालय व्यवस्थापनाने नातेवाइकांना सांगितले होते. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविल्यानंतर, ठाणे भाजपनेही महापालिका आयुक्त तसेच कापूरबावडी पोलिसांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. गुन्हा दाखल करण्याचा आग्रहही त्यांनी धरला होता. यासंदर्भात कोश्यारी यांची भाजपचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या आणि जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी राजभवन येथे भेट घेतली. या वेळी गायकवाड आणि सोनावणे कुटुंबीयांनीही आपल्या भावना राज्यपालांकडे व्यक्त केल्या. त्यांच्यासमवेत भाजपचे ठाणे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा पाटील, भाजयुमोचे सारंग मेढेकर आदी उपस्थित होते.ठाणे शहराला कोरोनाचा विळखा पडला असताना महापालिकेकडून विशेष सतर्कतेने रु ग्णांवर उपचार होण्याची गरज होती. मात्र, महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या विशेष कोरोना रुग्णालयातील गैरव्यवस्थेकडे सोमय्या आणि डावखरे यांनी लक्ष वेधले. गायकवाड-सोनावणे कुटुंबीयांच्या भावनांशी ठाणे महापालिकेने खेळ केल्याचा आरोपही त्यांनी केला.औषधांचा काळाबाजारकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिविर व टॉसिलिजुमैब औषधांचा मुंबई महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून काळाबाजार चालू असल्याप्रकरणी कारवाईची मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली.राजगृह हल्ल्याप्रकरणी दिले निवेदनभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदनही डावखरे यांनी या वेळी राज्यपालांना दिले. 

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस