मुंबई : जगासह देशभरात कोविड-१९ महामारीशी सामना करत असताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकारने ट्विटर सेवा सुरू केली. या सेवेच्या माध्यमातून भारतीयांचे त्यांच्या आरोग्य विषयक चौकशीचे जलदपणे समाधान करण्यात येणार आहे. या सार्वजनिक सेवेचा रिअल-टाइममध्ये पारदर्शक ई-गव्हर्नस सुविधा देण्याचा उद्देश आहे. ज्यामुळे सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ महामारी सारख्या संकटाच्या स्थितीमध्ये मंत्रालयाला लोकांसोबत प्रभावीपणे संवाद साधता येईल.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, काळानुरूप ट्विटर विशेषत: गरजेच्या काळात संवाद साधण्यासह माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सरकार व नागरिकांसाठी आवश्यक सेवा म्हणून सिद्ध ठरले आहे. सोशल डिस्टन्सिंगसोबत #IndiaFightsCorona ट्विटर सेवा सोल्यूशनचा अवलंब करत एकीकृत ऑनलाइन प्रयत्नांना सादर करण्याचा आनंद होत आहे. या सेवेमध्ये तज्ञांच्या टीमचा समावेश आहे, ज्यांना प्रत्येक चौकशीला उत्तम प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षित व सक्षम करण्यात आले आहे.
ही सेवा डॅशबोर्डवर कार्य करते. हे डॅशबोर्ड मोठ्या प्रमाणात ट्विट्सची प्रक्रिया करण्यामध्ये, त्यांना निराकरण करण्यायोग्य तिकिटांमध्ये रूपांतरित करण्यामध्ये आणि रिअल-टाइम संकल्पासाठी संबंधित अधिका-यांकडे पाठवण्यामध्ये मदत करते. हे संवाद पारदर्शक आहेत आणि सेवेमधील प्रत्येकाला सामान्य चौकशीबाबत अधिका-यांकडून प्रतिसादांचा लाभ मिळू शकतो.
हे अकाऊंट स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवर लोकांसाठी उपलब्ध असेल. तसेच सरकारने केलेल्या उपायांबाबत नवीन अपडेट्स, हेल्थकेअर सेवांच्या उपलब्धेबाबत माहिती किंवा लक्षणे असलेल्या व्यक्तीला कुठून मदत घ्यावी याबाबत माहित नसल्यास मार्गदर्शन अशा विविध सुविधांसह ही सेवा लोकांना अधिका-यांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत करेल. भारतातील लोक त्यांच्या आवडीच्या विविध भारतीय भाषांमध्ये @CovidIndiaSeva येथे ट्विट करत त्यांच्या चौकशीचे समाधान करू शकतात. ट्विटरने केंद्र व राज्य सरकारमधील संबंधित अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य अधिका-यांसोबत संवाद सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे ते ट्विटरच्या माध्यमातून समस्या जाणून घेऊ शकतात आणि धोरणात्मक कौन्सिलच्या मदतीने त्यांचे निराकरण करू शकतात, तसेच लोकांशी मोठ्या प्रमाणात कनेक्ट होऊ शकतात.
ट्विटसंदर्भात मार्गदर्शनकोविड-१९ संदर्भात नवीन विश्वसनीय माहितीसाठी @CovidIndiaSeva ला फॉलो करा. विशिष्ट कोविड-१९ संबंधित चौकशीबाबत प्रतिसादासाठी देखील तुम्ही @CovidIndiaSeva येथे ट्विट करू शकता आणि अधिकारी योग्य माहितीसह ट्विटला प्रतिक्रिया देतील. हे अकाऊंट कोरोनाव्हायरस-संबंधित चौकशीना प्रतिसाद देण्यासाठी आहे. पण तुमची चौकशी ट्विट करण्यासाठी कोणतीही खासगी किंवा संवेदनशील माहिती देण्याची गरज नाही, जसे संपर्क माहिती, ओळखपत्रे, वैयक्तिक आरोग्य माहिती इत्यादी.