coronavirus : अहो आम्हीही माणसं आहोत... आम्हालाही तपासा, मुंबई पोलिसांना भय अन् चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:06 AM2020-04-23T10:06:27+5:302020-04-23T10:12:11+5:30

राज्यभरात कोरोना बाधित पोलिसांचा आकड़ा ६४ वर, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना धसका 

coronavirus: Hey, we are also human beings ... check us too, fearful plea of Mumbai Police | coronavirus : अहो आम्हीही माणसं आहोत... आम्हालाही तपासा, मुंबई पोलिसांना भय अन् चिंता

coronavirus : अहो आम्हीही माणसं आहोत... आम्हालाही तपासा, मुंबई पोलिसांना भय अन् चिंता

Next

मनीषा म्हात्रे 

मुंबई : राज्यभरात कोरोना बाधित पोलिसांचा आकडा ६४ वर गेला आहे. यात १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये काळजी वाढत असताना, वरळी, जिजामाता नगर, धारावीसह प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी सध्या जास्त धसका घेतला आहे. त्यामुळे साहेब आम्हीही माणस आहोत. आमचीही कोरोना तपासणी करा.. अशी मागणी येथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकडून जोर धरत आहे.
      
वरळी पोलीस वसाहतीतील १० बाय १२ च्या खोलीत राहणारे एक अमलदार सांगतात, घरात दोन मुले, पत्नी आणि मी. त्यात  गावाकडे असलेल्या वृद्ध आईला एका डोळ्याने दिसने बंद झाल्याने दीड महिन्यापूरवी उपचारासाठी तिला मुंबईत आणले. शस्त्रक्रियेपूर्वी कोरोनाचे संकट वाढले. त्यामुळे सगळच थांबल. अशात जिजामाता नगर परिसरात नोकरी. मास्क आणि ग्लॉज देत बंदोबस्तासाठी सज्ज होतो. त्यानंतर कोणीही फिरकत नाही. शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. त्यात क्वॉरंटाईनची रुग्णाची ने आंण. आम्ही मात्र प्रवेशद्वारावर तसेच असतो. अशात घरी जायची भिती वाटते. छोट्याशया संसारात आपल्यामुळे इतरांना बाधा नको म्हणून फक्त सकाळी लवकर निघायच आणि रात्री उशिराने घर गाठायच असा दिनक्रम झाला आहे. 
             
स्वतःची सर्व काम स्वतःच करतो. अगदी कपड़े धुणयापासून जेवण बनवेपर्यन्त. रात्री झोपतानाही स्वतंत्र खोली नाही. म्हणून कुटुंबियापासून काही अंतर सोडून त्यांच्या पायाशी डोक करून झोपणयाचा पर्याय शोधला. जेणेकरून माझा श्वासही त्यांच्या पर्यन्त पोहचु नये. पालिका रुग्णालयात चाचणीसाठी मुहूर्त सापडत नाही. तर खासगी रुग्णालयात चाचणीसाठी साडे चार हजार रुपयांचा खर्च  परवडणारा नाही. त्यामुळे वरिष्ठाकड़े आमचीही चाचणी करा अशी मागणी करत आहोत. मात्र वरिष्ठ त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आम्हीही माणुस आहोत. आमची चाचणी वेळीच होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासारखे अनेक जण सध्या अशाच परिस्थितीत जगत आहे. वरळी कोळीवाडा परिसरात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अमलदारानेही तपासणीची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांत वरळी आणि धारावी झोपड़पट्टी परिसरात बंदोबस्ताला असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. जास्त झाल्यानंतर ते प्रकरण समोर आले. त्यामुळे आमचीही बंदोबस्ता पूर्वी आणि नंतर चाचणी होणे गरजेचे असल्याचे धारावी भागात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाने सांगितले.
 

Web Title: coronavirus: Hey, we are also human beings ... check us too, fearful plea of Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.