coronavirus: हायरिस्क रुग्णांचे प्रमाण वाढतेय, मुंबईसमोर नवीन संकट, गेल्या २४ तासांत पाच हजार जणांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 03:27 AM2020-08-30T03:27:11+5:302020-08-30T03:27:18+5:30
रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या २४ तासात तब्बल ५ हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून नोंदवल्या गेल्या.
मुंबई : मुंबई : महापालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. सध्या मुंबईत सरासरी हजार ते बाराशे रुग्ण आढळत आहेत.
मात्र, या रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईकरांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. गेल्या २४ तासात तब्बल ५ हजारांहून अधिक व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून नोंदवल्या गेल्या.
मुंबईत वारंवार प्रयत्न तसेच जनजगृती करूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाºया व्यक्तींचा आकडा दररोज वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात तब्बल ५४२९४२ व्यक्ती आल्या आहेत. या व्यक्तींचा समावेश अतिजोखमींच्या संपर्कात करण्यात आला आहे. त्यातील २ हजार २११ व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले असून २ हजार ७१८ व्यक्तींना कोविड केअर सेंटर एकमध्ये दाखल करण्यात आले.
मुंबईतील बाधित रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमी व्यक्तींचा आकडा वाढत आहे. दररोज साधारणत: ५ हजारांहून अधिक व्यक्तींचा समावेश अतिजोखमीचे संपर्क म्हणून केला जातोय. गेल्या आठवड्याभरात ४० हजार २९५ बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अतिजोखमीचे संपर्क ठरले आहेत. त्यातील २१ हजार ४३८ व्यक्तींना कोविड केअर सेंटर एकमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईतील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेडून ‘चेस दी व्हायरस’ मोहीम सुरू करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्याभरात ४० हजार २९५ बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अतिजोखमीचे संपर्क ठरले आहेत. त्यातील २१ हजार ४३८ व्यक्तींना कोविड केअर सेंटर एकमध्ये दाखल केले. संसर्ग रोखण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत़