Join us

Coronavirus : होम क्वॉरंटाइन व्यक्ती बाहेर दिसताच; सक्तीने भरती  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:00 AM

होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.

मुंबई : ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे त्यांनी घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामुग्रीदेखील उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे