Join us

coronavirus: लेखी हमी दिल्यावरच आता होम क्वारंटाईन, पालिका प्रशासनाचे सुधारित परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 5:51 AM

coronavirus in Mumbai: होम क्वारंटाईन असलेले कोरोनाबाधित रुग्ण अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आले आहेत.

मुंबई : होम क्वारंटाईन असलेले कोरोनाबाधित रुग्ण अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आले आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने पालिका प्रशासनाने आता कडक नियम लागू केले. बाधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांनाही लेखी हमी व फॅमिली डॉक्टरशी चर्चा केल्यानंतरच होम क्वारंटाईन होण्याची परवानगी  मिळेल. (Home quarantine, revised circular of municipal administration only after written guarantee)  पालिकेच्या नवीन नियमावलीनुसार, रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच दिवशी त्याच्या होम क्वारंटाईनची प्रक्रिया संबंधित विभाग कार्यालयाला पूर्ण करावी लागणार आहे. तसेच वाॅर रूममार्फत रुग्णांची नियमित विचारपूस करणेही बंधनकारक असेल. त्याचबरोबर प्रत्येक विभागातील समर्पित वैद्यकीय पथकाने होम क्वारंटाईन असलेल्या किमान दहा टक्के व्यक्तींच्या घरी रोज भेट देणे आवश्‍यक करण्यात आले आहे. 

...अन्यथा कारवाईहोम क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या रुग्णांना कोविड केंद्रात पाठविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईदेखील करण्यात येईल. फॅमिली डॉक्टरशी चर्चा करणारलक्षणविरहित, सौम्य लक्षणं असलेले, सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं नसल्यास त्यांना होम क्वारंटाईनची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी वैद्यकीय पथक संबंधित रुग्णाच्या फॅमिली डॉक्टरशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. तसेच स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र शौचालय असणे बंधनकारक आहे. मास्क आणि ग्लोव्हज वापरणे, ऑक्सिमीटरच्या मदतीने दैनंदिन तपासणी करून त्यांची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.यांच्यावर विशेष लक्षज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या बाधित रुग्णांमध्ये आठवडाभराने कोविडची लक्षणे दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जाऊन पडताळणी करण्याची जबाबदारीही पालिकेच्या वैद्यकीय पथकावर सोपविण्यात आली आहे. प्रसूती कालावधी दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी राहता येणार नाही.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिका