मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. हे Covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वैद्यकीय सल्ला तसचे आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्र मांक या लिंकवर उपलब्ध आहे. काही शंका असल्यास यात प्राथमिक पातळीवर आपल्या घरीच स्व-चाचणी करता यावी यासाठी सरकारने अपोलो २४७ यांच्या संयुक्त विद्यमाने हे टूल बनविले आहे.
विशेष बाब म्हणजे, या प्लॅटफॉर्ममुळे प्रशासनाला चाचणी घेतलेल्या नागरिकांचा रिअल टाइम डॅशबोर्ड बघता येतो. या टूलने चाचणी केल्यावर व्यक्तीमध्ये कोरोनासदृश लक्षणे असल्यास हे तपशिल प्रशासनापर्यंत पोहोचतात. यामुळे संभाव्य संक्र मणास अधिक प्रभावीपणे शोधण्याची मदत होईल.
स्व-चाचणी टूलचे वैशिष्ट्य
स्व-चाचणी टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. कोविड-१९चा प्रभावीपणे सामना करण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वपूर्ण माहिती एकत्र करणे तसेच योग्य जनजागृती करून विद्यमान संसर्गाचे अधिक चांगले व्यवस्थापन करणे हा या सुविधेचा मुख्य हेतू आहे.