मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार, बुधवापासून ^‘पुनश्च हरिओम’अंतर्गत हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, परंतु ६० ते ७० टक्के हॉटेल सुरू होतील, अशी माहिती हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाने दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हॉटेल संघटनांसोबत रविवारी बैठक झाली होती. त्यानंतर, मंगळवारी काही नियमावलीनुसार ८ जुलैपासून हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. याबाबत हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्षिश सिंग कोहली म्हणाले की, आता ३३ टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे, परंतु लवकरच ७५ टक्के, १०० टक्के हॉटेल सुरू होतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सरकारने जो निर्णय घेतला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सरकारने ज्या कार्यपद्धतीने काम करण्यास सांगितले आहे, त्यानुसार हॉटेल सुरू करणार आहोत.३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्यास कामगार तयार आहेत, परंतु अनेक कामगार परराज्यात गेले आहेत. सरकारने रेल्वे, रस्ते वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. त्यामुळे स्थलांतरित कामगार परत येऊ शकतील, तसेच लोकही येऊ शकतील. हॉटेल सुरू करण्यास आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. एकूण हॉटेल पैकी ६० ते ७० टक्के हॉटेल उद्या सुरू होतील, तर उर्वरित ३० ते ४० टक्के हॉटेल ज्यांचे कामगार नाहीत, साफसफाई बाकी आहेत, अशी हॉटेल्स पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.बुफे पद्धत बंद, आता मिळणार पॅक फूडसरकारी निर्देशानुसार, हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान पाहिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना मास्क, फेसशिल्ड देण्यात आले आहे. ग्राहकांसाठी प्रत्येक रूममध्ये सॅनिटायजर असेल. रूमचे दोन ते तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्राहकांना त्यांच्या खोलीबाहेर जेवण आणि नाश्ता दिला जाईल. पूर्वीप्रमाणे भांड्यामध्ये जेवण न देता पॅकफूड देणार आहोत. त्यासोबतच रूममध्येही फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे, म्हणून ५० टक्के टेबल कमी केले आहेत, असे खार येथील एका हॉटेल चालकाने सांगितले.
coronavirus: आज राज्यातील हॉटेल्स होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 7:27 AM