Coronavirus: शहरनिहाय वेगळे नियम कसे?; आयसीएमआरच्या निर्देशाचे स्थानिक स्तरावर उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:20 AM2020-07-01T03:20:45+5:302020-07-01T03:21:02+5:30

मुंबई महानगर प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका आणि सरकारी दवाखान्यांत खाटांची संख्या मर्यादित असल्याने लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचाराची सुविधा देण्यात आली आहे

Coronavirus: How to differentiate city-wise ?; Local violation of ICMR directives | Coronavirus: शहरनिहाय वेगळे नियम कसे?; आयसीएमआरच्या निर्देशाचे स्थानिक स्तरावर उल्लंघन

Coronavirus: शहरनिहाय वेगळे नियम कसे?; आयसीएमआरच्या निर्देशाचे स्थानिक स्तरावर उल्लंघन

Next

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार कोरोनाची लक्षणे नसलेल्यांना घरीच उपचाराची सुविधा देण्यात यावी, असे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सर्व राज्यांना दिलेले असताना महाराष्ट्रात मात्र शहरनिहाय नियम बदलण्यात आल्याने रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय संभ्रमात आहेत.

मुंबई महानगर प्रदेशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका आणि सरकारी दवाखान्यांत खाटांची संख्या मर्यादित असल्याने लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व उपनगरे, ठाणे, नवी मुंबईत सुमारे ४ हजार रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत.

पुणे, औरंगाबाद, लातूरमध्येही परवानगी आहे. नाशिकमध्ये ८१ रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. तर कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर, जळगाव, सोलापूर शहरांत अशी परवानगी देण्यात आलेली नाही. घरातील सदस्य विलगीकरणाचे नियम पाळत नाहीत. घरातील लोक घराबाहेर जाणार नाहीत यावर नियंत्रण ठेवणे अशक्य असते, असे जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप मुरंबीकर यांनी सागितले.

लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार 
1. घरात पुरेशी जागा हवी
2. रुग्णांची काळजी घेणारी सक्षम व्यक्ती हवी
3. संपर्कासाठी दूरध्वनी अथवा मोबाईल हवा
4. कुटुंबातील इतर सदस्यांना बाधा झालेली नसावी
5. रुग्णासाठी स्वतंत्र रुम, स्वच्छतागृह असावे
6. अबालवृद्धांशी रुग्णाचा संपर्क होऊ नये
7. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने
दवाखान्यात पोहोचण्याची सोय हवी

सर्व बाबींची पडताळणी
औरंगाबादमध्ये लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. रुग्णाच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जाते. परंतु ही सुविधा सर्वांना सरसकट दिली जात नाही. सर्व बाबी पडताळून पहिल्या जातात आणि त्यानंतरच होम आयसोलेशनला परवानगी दिली जात असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

सुविधा असेल तर परवानगी
लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या विनंतीवरून घरीच उपचाराची मुभा दिली जाते. पण यासाठी तेथे सुविधा आहेत के हे तपासले जाते. जवळचा दवाखाना, डॉक्टरची उपलब्धता व रुग्णाच्या घरी स्वतंत्र यंत्रणा असेल तर महापालिका क्षेत्रात आरोग्य अधिकारी परवानगी देतात. ग्रामीण भागात अशा एकाही रुग्णाला परवानगी दिलेली नाही. त्यांना इन्स्टिट्युट क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे, अशी माहिती सोलापर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

जळगावात 'होम आयसोलेशन'ला नकार
कोरोना बाधित असलेल्या ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत,अशांना घरीच उपचाराची मुभा देण्यासंदर्भात केंद्र सरकाडून निर्णय घेण्यात आला़ मात्र, जळगावात स्थानिक पातळीवर तशा सुविधा नसून संसर्ग वाढत्या स्टेजमध्ये असल्याने अद्याप तसा निर्णय घेण्यात आला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी सांगितले़

Web Title: Coronavirus: How to differentiate city-wise ?; Local violation of ICMR directives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.