Join us

CoronaVirus News: आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरची माहिती आता एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:18 AM

एअर व्हेंटी अ‍ॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध

मुंबईतील कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, याबाबत माहिती देणारी यंत्रणा महापालिकेने आपत्कालिन नियंत्रण कक्षात उपलब्ध केली आहे. त्यांनतर आता मुंबईतील कोणत्या रुग्णालयात अति दक्षता विभागात किती खाटा व व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, याची माहिती मुंबईकरांना ^‘एअर व्हेंटी’ या अ‍ॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध होईल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात हा अ‍ॅप कार्यान्वित केला.पालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या डॅशबोर्डसोबत हे अ‍ॅप संलग्न असणार आहे. या अ‍ॅपद्वारे मुंबईतील सर्व रुग्णालयांची माहिती मिळेल. पालिकेच्या अ‍ॅपवर या अ‍ॅपची लिंक व या अ‍ॅपवर पालिकेच्या अ‍ॅपची लिंक उपलब्ध आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता हे अ‍ॅप उपयुक्त ठरेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. गूगल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप नागरिकांनी विनामूल्य डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या