Join us

coronavirus: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:28 AM

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

ठळक मुद्दे१२ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या चाकरमान्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ टेस्ट करून यावे लागेलअसा अहवाल घेऊन येणाऱ्या चाकरमान्यांना होम क्वारेंटाइन बंधनकारक असेलजिल्ह्यातील नागरिकांनी गणेशोत्सव कमीतकमी दिवसांचा आणि घरच्याघरी साजरा करावा

सिंधुदुर्ग/मुंबई - कोकणातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक असलेला गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने कोकणात जाणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकाने क्वारेंटाइन तसेच कोरोनाबाबतच्या नियमांमध्ये अनेक सवतली दिल्या आहेत. दरम्यान, गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात १२ ऑगस्टपर्यंत एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना १० दिवसांचे होम क्वारेंटाइन लागू राहणार आहे. एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ई-पासची आवश्यकता नसेल. पण खासगी वाहनांनी येणाऱ्यांसाठी ईपास आवश्यक असेल.तसेच १२ ऑगस्टनंतर गावी येणाऱ्या चाकरमान्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ टेस्ट करून यावे लागेल. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ह असावा लागेल. त्याबरोबरच असा अहवाल घेऊन येणाऱ्या चाकरमान्यांना होम क्वारेंटाइन बंधनकारक असेल.याबरोबरच सिंधुदुर्गवासियांनाही गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामध्ये यावर्षी गणेशोत्सव हा कमीत कमी दिवसांचा साजरा करावा. गणपतीची पूजा पुरोहितामार्फत न करता स्वत: करावी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून करावी. आगमन विसर्जनाला मिरवणूक काढू नये. आरती, भजने, फुगड्या, गौरी, वसा आदी कार्यक्रम घरच्या घरी गर्दी होऊ न देता करावेत. कार्यक्रमानिमित्त घरोघरी भेटी देणे टाळावे. गावातील वाडीतील गणपतींचे विसर्जन एकत्रित करू नये.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तहसिलदारांची परवानगी घेऊन, भपकेबाजपणा टाळून छोट्या मंडपात गणेशोत्सव साजरा करावा. मंडपात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. दर्शनाला येणाऱ्या भाविकांची नोंद ठेवावी, म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शक्य होईल, तसेच ऑनलाइन दर्शनाव भर द्यावा, दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळले जाई याची काळजी घ्यावी. 

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरससिंधुदुर्गगणेशोत्सव