Join us

coronavirus: सुधारलेल्या अत्यवस्थ रुग्णाची होणार डिस्चार्जपूर्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:48 AM

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ हजारांवर पोहोचला आहे. मात्र यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तत्काळ सुविधा मिळावी, यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या नियमात काही सुधारणा केल्या आहेत.

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचणी संदर्भातील सुधारित नियमानुसार सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला डिस्चार्ज देताना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र अत्यवस्थ असलेला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याची चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. तर, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्यांपैकी फिव्हर क्लिनिक व पालिका तसेच सरकारी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातून पाठविण्यात आलेल्या रुग्णांची चाचणी यापुढे केली जाणार आहे.मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ हजारांवर पोहोचला आहे. मात्र यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तत्काळ सुविधा मिळावी, यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या नियमात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार तत्काळ शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्यारुग्णाला कोरोना चाचणीचाआग्रह धरून उपचार नाकारता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेआहे.या सुधारित नियमावलीनुसार सौम्य, अति सौम्य व लक्षण पूर्व प्रकरणांमध्ये सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी रुग्णांमध्ये कोणती लक्षणे नसल्यास डिस्चार्जपूर्वी त्यांची चाचणी करण्याची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.मात्र अत्यवस्थ व रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये सलग तीन दिवस कोणतीही लक्षणे नसल्यास डिस्चार्जपूर्वी त्यांची चाचणी करणे आवश्यक असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.असे आहेत काही बदल...आवश्यक शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण कोरोनाबाधित असल्याची शंका असल्यास आणि त्याच्यावरील शस्त्रक्रिया ४८ तास थांबविणे शक्य असल्यास त्याच्या चाचणीचा आग्रह डॉक्टर करू शकतात. मात्र शस्त्रक्रिया तत्काळ होणे आवश्यक असल्यास चाचणीसाठी शस्त्रक्रिया नाकारता येणार नाही.एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती चाचणी अहवाल आल्यानंतर एका तासाच्या आत महापालिकेला देण्यात यावी. पालिकेला कळविल्याशिवाय संबंधित रुग्णाला सांगू नये.लक्षणे असल्याने चाचणी केलेल्या रुग्णांनाच संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे. मात्र लक्षणे असलेल्या अन्य रुग्णांची चाचणी केवळ नोंदणीकृत डॉक्टरांनीशिफारस केली असल्यास करण्यात यावी.गरोदर महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे नसली तरी प्रसूतीसाठी तिचे नाव नोंदविण्यात आलेल्या रुग्णालयात तिची चाचणी करण्यात यावी.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई