Join us

coronavirus: कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:13 AM

coronavirus: काेराेनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असून, बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या जास्त आहे. 

मुंबई : काेराेनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत असून, बाधितांमध्ये लक्षणे नसलेल्यांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यांचे घरी विलगीकरण करून औषधोपचार दिले जात आहेत. त्याआधारे ते पूर्णपणे बरे होतात, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.आता रुग्णाला घरी विलगीकरण करण्याची सूचना दिल्यानंतर वैद्यकीय पथकाच्या मदतीने अशा रुग्णाचे घर विलगीकरणासाठी योग्य असल्याची खात्री केली जाणार आहे, तर प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर असलेल्या गर्भवती महिलांना घरी विलगीकरण लागू नसेल. स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सकांच्या एकत्रित विचार-विनिमयानुसार योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे वाढीस लागली, तर त्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणार आहे.रूग्ण वाढीमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.  गृह विलगीकरणासाठी पात्रतेचे निकष जे रुग्ण कोविड चाचणी केल्यानंतर बाधित आढळले आहेत, अशा रुग्णांचे घरी विलगीकरण करता येऊ शकते. लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक), सौम्य लक्षणे असलेले (म्हणजे ज्यांना सहव्याधी नाहीत, ताप १०० फॅरनहाइटपेक्षा कमी आहे, ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा अधिक आहे व इतर सामान्य निकष), प्रौढ तसेच सहव्याधी असलेले, असे रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत, त्यांची तपासणी केल्यानंतरच त्यांचे विलगीकरण करण्यात येईल. रुग्णाने घ्यायची काळजी रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली, स्वतंत्र प्रसाधनगृह असणे गरजेचे आहे. रुग्णाने पल्स ऑक्सिमीटर, डिजिटल थर्मामीटर, फेस मास्क, हातमोजे, निर्जंतुकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) याचा उपयोग करावा.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई