Join us

CoronaVirus : घरगुती मास्कचा वापर वाढवा; बाजारातील मास्कच्या तुटवड्यावर माहिती तंत्रज्ञान विभागाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:54 PM

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतेच्या उत्पादनांच्या विशेषतः मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीकडे वळल्यामुळे अचानक मागणी वाढून टंचाई निर्माण झाली.

मुंबई: मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीकडे ग्राहक वळल्यामुळे अचानक मास्कची मागणी वाढून टंचाई निर्माण झाली आहे. म्हणून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घरच्या घरीच मास्क बनवण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी आवाहन केले आहे. यासाठी घरी मास्क कसे बनविले जाऊ शकते त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो यासाठी एक पुस्तिका ही तयार केली असून, ती  Http://bit.ly/DIYMasksCorona या संकेतस्थळवरून डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वच्छतेच्या उत्पादनांच्या विशेषतः मास्क आणि हात धुवायच्या सॅनिटायझर्सच्या खरेदीकडे वळल्यामुळे अचानक मागणी वाढून टंचाई निर्माण झाली. म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने घरच्या घरीच मास्क बनवण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांनी फेस मास्क वापरावा, अशी मागणी दुकाने आणि सेवांकडून केली जात आहे. काही दुकानांमध्ये गिऱ्हाईकांनी मास्क न वापरल्यामुळे त्यांना सेवा नाकारण्यात आली. अनेक आरोग्य तज्ज्ञदेखील सार्वजनिक ठिकाणी फेस मास्कचा वापर करण्याची सूचना करत आहेत. जेणेकरून संसर्गाचा प्रसार कमी होईल. विशेषतः दाट लोकवस्ती असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना मास्क घालण्याची खास शिफारस करण्यात आली आहे.

परिस्थितीवर मात करण्यासाठी, केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने मंगळवारी घरी मास्क बनवण्याविषयी पुस्तिका जारी केली आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तीना स्वतः मास्क बनवण्यासाठी माहिती देण्यात आली असून मास्क तयार करणे, वापरणे आणि त्याचा पुन्हा उपयोग कसा करावा याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले आहे. याद्वारे देशभरात मोठ्या प्रमाणात मास्कच्या वापराला चालना मिळेल. हे मास्क बनवण्यासाठी आवश्यक सामुग्रीची सहज उपलब्धता, घरी बनवण्यास सोपे आणि वापरायला सुटसुटीत आणि पुनर्वापर हे प्रमुख निकष आहेत.

घरी बनवण्यात आलेल्या मास्कमुळे वापरामुळे एन-९५ आणि एन-९९ मास्कची मागणी कमी होण्याची शक्यता आहे, जेणेकरून त्याचा वापर जे कोविड-१९ शी लढणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करू शकतील असे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस