coronavirus: बांगलादेश, अमेरिकेत अडकलेले भारतीय अखेर मुंबईत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:23 AM2020-05-12T07:23:48+5:302020-05-12T07:24:14+5:30
याआधी रविवारी एका दिवसात ८१३ प्रवाशांचे आगमन झाले. आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी कोणीही कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येत आहे.
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगाच्या विविध भागांत अडकलेल्या भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानांनी भारतात आणण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी पहाटे पावणेपाच वाजता अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथून प्रवाशांचा एक गट मुंबईत परतला. तर, सायंकाळी साडेसहा वाजता बांगलादेशमधील ढाका येथून ११० भारतीयांना घेऊन आलेल्या विमानाने लँडिंग केले.
भारतीय प्रवाशांना घेऊन सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता न्यूयॉर्क येथून एक विमान मुंबईत दाखल होणार आहे. त्यामधून ३१९ प्रवासी परतण्याची शक्यता आहे. या विमानातून मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांना मुंबईत बेस्ट बसने व मुंबईबाहेर राज्याच्या विविध भागांत एसटी बसने घरी, हॉटेलमध्ये पोहोचवण्यात येणार आहे.
याआधी रविवारी एका दिवसात ८१३ प्रवाशांचे आगमन झाले. आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी कोणीही कोरोनाग्रस्त आढळलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सुमारे अडीच हजार भारतीय जगाच्या कानाकोपºयातून मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विशेष विमानाने दाखल होतील.