Join us

बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; आगारात चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 1:13 AM

२१ मार्च रोजी वडाळा बस आगारातील वाहतूक प्रशिक्षण केंद्रात त्याने हजेरी लावली होती.

मुंबई : महापालिकेच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता बेस्ट कर्मचाºयाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वडाळा बस आगारातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर अन्य कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा कर्मचारी राहत असलेल्या टिळकनगर येथील इमारतीमधील रहिवाशांना तसेच त्याच्या सहकाऱ्यांना १४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचे समोर येत आहे. वरळीमध्ये राहणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याची नियुक्ती धारावी येथे सफाईच्या कामासाठी करण्यात आली होती.

गुरुवारी या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर धारावी आणि वरळी येथे त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची आरोग्य चाचणी सुरू आहे. शुक्रवारी वडाळा येथील बेस्ट बस आगारातील पुरवठा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा कर्मचारी राहत असलेल्या टिळकनगर येथील इमारतीमधील रहिवाशांना तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

लागण झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्याची माहिती...

कोरोनाची लागण झालेल्या बेस्टच्या पुरवठा विभागातील कर्मचारी २६ मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. १८ आणि १९ मार्च या दोन दिवसांच्या सुट्टीत तो गावी जाऊन आल्यानंतर २० मार्च रोजी हुतात्मा चौक रिसिविंंग स्टेशनवर त्याने काम केले.

२१ मार्च रोजी वडाळा बस आगारातील वाहतूक प्रशिक्षण केंद्रात त्याने हजेरी लावली होती. मात्र २२ मार्चपासून ताप येत असल्याने त्याने कामावर येणे बंद केले. च्त्याला कोरोना झाल्याचे उजेडात आल्यानंतर त्याच्या विभागात काम करणाºया अन्य कर्मचाºयांना १४ दिवस घरी वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. वडाळा बस आगारातील पुरवठा विभाग बंद करून तिथे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याबेस्ट