कल्याण : मुंबईत काम करणाºया सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांना ८ मेपासून कल्याण-डोंबिवलीत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय स्थगित करण्यात करण्यात आला आहे.
मुंबईत काम करणारे अत्यावश्यक सेवेतील अनेक सरकारी व खासगी कर्मचारी कल्याण-डोंबिवलीत राहायला आहेत. ते सध्या कल्याण-डोंबिवलीहून तेथे बस अथवा खासगी वाहनाने येजा करतात. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, त्यात मुंबईत काम करणाºयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मुंबईतच त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे या कर्मचाºयांची व्यवस्था मुंबईतच त्यांच्या कामाच्या ठिकाणी करावी अशी मागणी विविध लोकप्रतिनिधी व संस्थांनी केली. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी मुंबईत काम करणाºयांना कल्याण-डोंबिवलीत ये-जा करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला. मात्र तूर्तास इतक्या सगळ्या कर्मचाºयांची व्यवस्था करण्यास बराच वेळ लागणार आहे. जोपर्यंत ठोस व्यवस्था होत नाही, तोपर्यंत प्रतिबंध करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.मुंबईत काम करणाºया सरकारी कर्मचाºयांची राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिका करणार असल्याचा उल्लेख मंगळवारी झाला होता. परंतु, कर्मचाºयांच्या कुटुंबीयांचे काय, असा सवाल केला जात होता. मुंबईत राहण्याची व्यवस्था केली तरी तेथे सगळा संसार तेथे स्थलांतरित करणे शक्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.सरकारने तोडगा काढावाकर्मचाºयांच्या निवासाची व्यवस्था ही हॉटेलमध्येच करावी लागणार आहे. परंतु, लॉकडाउनमुळे निवासाची सोय असलेली हॉटेल्स बंद आहेत. दुसरीकडे मंगळवारच्या आदेशात खासगी आस्थापनातील कर्मचाºयांची व्यवस्था त्यांच्या कंपन्यांनी करावी, असे म्हटले होते.मात्र, सध्या ही व्यवस्था करणे खासगी आस्थापनांनाही परवडणारे नाही. त्यावर योग्य तो तोडगा सरकारने काढावा, अशी अपेक्षा कर्मचारी करत आहेत. मुंबईत काम करणाºयांचा समावेश आहे. मुंबईतच त्यांना लागण झाली आहे. या कर्मचाºयांची व्यवस्था त्यांच्या कामाच्या ठिकाणी करावी अशी मागणी आहे़