Join us

CoronaVirus: मुंबईत कोरोनाची तीव्रता होतेय कमी; मृत्यूदरातही घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 3:55 AM

कोरोनाच्या तीन अंकी रुग्णसंख्येचे प्रमाण आता दोन अंकावर आले असून मृत्यूदरांतही घट झाली आहे.

मुंबई : मागच्या काही दिवसांत मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांच्या चिंतेत सातत्याने भर घालत होती. मात्र आता मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईत कोरोनाची तीव्रता कमी होते आहे. कोरोनाच्या तीन अंकी रुग्णसंख्येचे प्रमाण आता दोन अंकावर आले असून मृत्यूदरांतही घट झाली आहे.मुंबईत गेल्या आठ दिवसांपासून वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून कमी होऊ लागल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. १४ एप्रिल रोजी २०४ झालेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १५ एप्रिल रोजी १८३ वर आणि तर १६ एप्रिल ७६ रुग्णांची घट होत थेट १०७ वर आल्याने महामुंबईत आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी खाली आली. राज्य सरकार आणि पालिकेच्या माध्यमातून मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेणे, संपर्कात आलेल्या आणि संशयितांना क्वारंटाइन करून देखरेख ठेवणे, उपचार करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अशा उपाययोजना केल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २१ ते ४० वयोगटातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसते. लहान बाळांपासून दहा वर्षांपर्यंत ५२ पॉझिटिव्ह रुग्ण असून यात स्त्री-पुरुष प्रमाण प्रत्येकी ५० टक्के एवढे प्रमाण आहे. तर ११ ते २० वर्षे वयोगटात १५० रुग्ण आहेत. त्यात पुरुष ५० टक्के तर महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे.कोरोनाच्या मृतांमध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे लहान बाळांपासून २० वर्षे वयोगटात आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये सुमारे ७० टक्के प्रमाण हे वयोवृद्ध आणि प्रदीर्घ आजार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, ६१ ते ७० या वयोगटात सर्वाधिक ३९ मृत्यू झाले आहेत.ठाणे जिल्ह्यात आणखी ४४ नवे रुग्णठाणे : ठाणे आणि कल्याण- डोंबिवली या महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना शनिवारी अचानक या दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह रु ग्ण अनुक्रमे १५ आणि १३ ने वाढली. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या ३६४ इतकी झाली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या