Join us

रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? - आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:08 PM

चीनच्या धर्तीवर कोरोना उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मागावलेली निविदा सदोष, आशिष शेलार यांची टीका

ठळक मुद्देकस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरात चीनच्या धर्तीवर कोरोना विशेष रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहेया निविदेमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे अशा संवेदनशील कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांचीच "प्रकृती" तपासण्याची गरजनिविदेत शीतकरण, संसर्ग रोखणारी यंत्रणा,विजेचे ट्रान्सफॉर्मर आणि दाब या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख नाही

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र असे असूनही मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील आव्हानाचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारात चीनच्या धर्तीवर कोरोना रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या रुग्णालयासाठी मागवण्यात आलेली निविदा सदोष असल्याचा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच  रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? अशी विचारणा त्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. 

आशिष शेलार यांनी कोरोना रुग्णालयासंदर्भात ट्विट करून सवाल उपस्थित केले आहेत. यात ते म्हणतात की, ''कस्तुरबा रुग्णालयाच्या परिसरात चीनच्या धर्तीवर कोरोना विशेष रुग्णालय उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. मात्र या निविदेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील कामासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांचीच "प्रकृती" तपासण्याची गरज आहे. त्या सल्लागारांच्या पालिकेने वेळीच चाचण्या करुन घ्याव्यात.''

शेलार पुढे म्हणतात की,''पालिकेने काढलेल्या निविदेत शीतकरण, संसर्ग रोखणारी यंत्रणा,विजेचे ट्रान्सफॉर्मर आणि दाब या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख नाही. हा विलगीकरण कक्ष असल्याने येथे शस्त्रक्रिया होणार नाही तर मग निविदेत नायट्रस ऑक्साईड कशासाठी? रुग्ण, डाँक्टर, नर्स यांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर?, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईमुंबई महानगरपालिकाआशीष शेलार