Join us

Coronavirus: सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 2:56 AM

पालिका प्रशासनाचा इशारा; अन्यथा एक हजार रुपये दंड

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते, परंतु लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असताना अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. याची गंभीर दखल घेत यापुढे सार्वजनिक स्थळांसह खासगी कार्यालये आणि वाहनांमधूनही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. हा नियम मोडणाऱ्या व्यक्तीकडून एक हजार रुपये दंड व कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक विभागांमध्ये नियंत्रणात आला आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊन शिथिल करीत ‘पुनश्च हरिओम’ करण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावर वर्दळ वाढल्यामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे. तरीही काही नागरिक खबरदारी घेत नसल्याने त्यांची व इतरांचीही सुरक्षा धोक्यात येत आहे. याची दखल घेत, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी परिपत्रक काढत सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालय व प्रवासातही मास्क वापरणे बंधनकारक केल्याचे स्पष्ट केले.

पोलीस, पालिकेमार्फत कारवाईनियमाचे उल्लंघन करणाºया व्यक्तीवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा प्रत्येक उल्लंघनासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पोलीस, तसेच पालिकेच्या सहायक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असणार आहेत. त्याचबरोबर, मास्क व सॅनिटायजरचा उपयोग करणे, सुरक्षित अंतराचे नियम पाळणे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. या सर्व ठिकाणी मास्क गरजेचारस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यांसारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येकनागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे, तसेच कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानाही प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना, कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहिल्यास ते नियमांचे उल्लंघन ठरणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस