Coronavirus: वसई-विरारला रात्री थांबणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 03:22 AM2020-05-03T03:22:26+5:302020-05-03T03:22:45+5:30

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर । शाळेत केली जाते व्यवस्था

Coronavirus: Lack of facilities for the best employees staying overnight at Vasai-Virar | Coronavirus: वसई-विरारला रात्री थांबणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांची वानवा

Coronavirus: वसई-विरारला रात्री थांबणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांची वानवा

googlenewsNext

मुंबई : लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांसाठी बेस्टकडून गाड्याची व्यवस्था केली आहे. वसई-विरार येथे रात्री आठ ते दहा गाड्या थांबविण्यात येतात. या गाड्यांवरील बेस्टच्या कर्मचाºयांची व्यवस्था एका शाळेत करण्यात आली आहे. परंतु त्या ठिकाणी सोयीसुविधांची वानवा आहे.

बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस जगनारायण गुप्ता म्हणाले की, वसई-विरार भागात मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी राहतात. लॉकडाउन काळात मुंबईत येणाºया कर्मचाºयांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभरात २४० बस कर्मचाºयांची ने-आण करतात. परंतु त्यापैकी ८ ते १० बस वसई-विरार येथे थांबविण्यात येतात. त्या बस सकाळी लवकर कर्मचाºयांना घेऊन येतात. परंतु वसई-विरारला जाऊन रात्री थांबून सकाळी परतणाºया बेस्ट कर्मचाºयांना विश्रांतीसाठी जीवदानी मंदिराशेजारील शाळेत सोय केली आहे. त्या ठिकाणी सोयीसुविधांची वानवा आहे. या शाळेत तेथील रस्त्यावर राहणाºया आजारी लोकांच्या राहण्याची व्यवस्थादेखील केलेली आहे. परंतु सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाहीत, अशा तक्रारी अनेक कर्मचारी करत आहेत. बेस्ट कर्मचाºयांना शाळेतील दोन वर्ग दिले आहेत. दहा पंखे आहेत, परंतु त्यातील चार बंद आहेत. पाणी आणि शौचालय या मूलभूत सुविधाही तिथे नाहीत. मग बेस्ट कामगार सुरक्षित कसा राहणार, असा सवाल गुप्ता यांनी विचारला आहे. कामगारांच्या जीवनाचा प्रशासन का विचार करत नाही? जसे विलिनीकरणाचा प्रश्न टांगणीवर आहे, तसे कामगारांच्या ५० लाखांचा विम्याचा प्रश्नही टांगणीवरच का? कामगारांना जाणूनबुजून संपवायचे चालवले आहे का, असेही ते म्हणाले.

पिण्यासाठी पाणीही नाही
बेस्ट कर्मचाºयांसाठी वसई-विरार महापालिकेच्या एका नगरसेवकाने पालिकेच्या समाजकल्याण कार्यालयातील एक खोली दिली होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्या खोलीत झोपण्यास मनाई करण्यात आली. आता एका शाळेत काही जण झोपत आहेत. त्या ठिकाणी सोयीसुविधा नाही. पिण्यासाठी पाणीही नाही. कर्मचाºयांना पाण्याची बाटली न्यावी लागत आहे. तर काही कर्मचारी बसमध्येच रात्र काढत आहेत.

Web Title: Coronavirus: Lack of facilities for the best employees staying overnight at Vasai-Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट