Coronavirus: वांद्रे येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी; हजारोंच्या संख्येने उतरलेल्या जमावामुळे परिसरात तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:04 PM2020-04-14T18:04:11+5:302020-04-14T18:14:32+5:30

मुंब्रा पाठोपाठ वांद्रे पश्चिम बस डेपोजवळ तुफान गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं

Coronavirus: A large group of migrant labourers gathered in Bandra pnm | Coronavirus: वांद्रे येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी; हजारोंच्या संख्येने उतरलेल्या जमावामुळे परिसरात तणाव

Coronavirus: वांद्रे येथे लॉकडाऊनची ऐशीतैशी; हजारोंच्या संख्येने उतरलेल्या जमावामुळे परिसरात तणाव

Next

मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.

मुंब्रा पाठोपाठ वांद्रे पश्चिम बस डेपोजवळ तुफान गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं, परराज्यातील कामगारांनी मूळगावी जाण्यासाठी आग्रह धरला आहे. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावल्याचे सांगत हजारोंच्या संख्येने ही मंडळी रस्त्यावर उतरले आहेत. गावी सोडण्याची मागणी करत आहेत. याठिकाणी पोलिसांनी मोठ्या संख्येने बंदोबस्त लावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली त्यानंतर या मजुरांमध्ये आक्रोश निर्माण झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सरकारने हे पाऊल उचललं असलं तरी यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही कोरोनापेक्षा उपासमारीने मरू अशा शब्दात मजुरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान सुरतमध्येही हाती काम नसल्यामुळे मजुरांनी दोन ठिकांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची घटना घडली होती. सूरत येथील डायमंड बुर्समध्ये बांधकाम मजूर आणि लसकाणामध्ये सूतगिरणी कामगार रस्त्यावर उतरले. लॉकडाऊन सुरु राहिले, तर राहायचे कसे, असा सवाल करत एकतर काम सुरु करा किंवा घरी तरी जाऊ द्या, अशी मागणी या कामगारांनी केली. यावेळी सूतगिरणी कामगारांनी भाजीच्या पाच गाड्यांना आग लावली. तसेच रुग्णवाहिका आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली होती.

देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार चिंतेत आहे. ही सामुदायिक संसर्गाची शक्यता असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन वाढवून जिथे अधिक रुग्ण आढळत आहेत, तिथे लोकांना अजिबात घराबाहेर पडू न देणे हाच मार्ग सरकारला दिसत आहे. त्याची राज्यांनी अधिक कडक अंमलबजावणी करावी, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे.

Read in English

Web Title: Coronavirus: A large group of migrant labourers gathered in Bandra pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.