Join us

CoronaVirus in Mumbai: पनवेलमध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला; राज्याचा आकडा 123 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 10:27 PM

आज सापडलेला रुग्ण अमेरिकेतील न्यूयॉर्कहून भारतात आला होता. इथे त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

पनवेल : पनवेलमध्ये आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण सापडला असून खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कामोठ्यामध्ये सापडलेला पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. 

आज सापडलेला रुग्ण अमेरिकेतील न्यूयॉर्कहून भारतात आला होता. इथे त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्याला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत. पनवेल महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

हा रुग्ण ३९ वर्षांचा आहे. तो मुंबई विमानतळावरून कॅबने पनवेलमध्ये आला होता. यामुळे या टॅक्सीचालकाचाही शोधण्यात आले आहे. या टॅक्सी चालकाचीही कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. दुबईवरून पती पत्नी आणि त्यांची मुलगी आली होती. मुंबई विमानतळावरून त्यांनी कॅबने पुणे गाठले होते. या कॅब चालकालाही कोरोनाची लागण झाली होती. 

मुंबईत आल्यानंतर पुन्हा ही कॅब बूक करणाऱ्या वृद्धालाही कोरोनाची लागण झाली होती. अंधेरीच्या या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचा हा पहिला बळी होता. या वृद्धाला संक्रमन झाल्याने त्याची पत्नी आणि मुलालाही कोरोनाची लागण झाली होती.  त्यांच्यावर कस्तुरबामध्ये उपचार सुरु आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईपनवेल