मुंबई - वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटी लगत असलेल्या अवर लेडी हेल्थ चर्च येथील आश्रम शाळेतील 14 विशेष मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची टेस्ट केली असता ही 14 विशेष मुले कोरोनाबाधित आढळली. तसेच येथील 4 कर्मचाऱ्यांना सुद्धा कोविडची बाधा झाली आहे. येथील इतर मुलांना बाधा होवू नये म्हणून प्रत्येक मुलांना स्वतंत्रपणे येथील चर्चच्या हॉस्टेलच्या खोलीतच ठेवण्यात आले. मुलांवर नियमीत उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनच उपचार सुरू केले आहे. या मुलांची तब्येत आता स्थिर आहे.
14 मुलांना ताप येत असल्याची माहिती कळताच बाजार व उद्यान समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 59 च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, शाखाप्रमुख सतिश परब, के पश्चिम वॉर्डचे डॉ.आदिल यांच्यासह तप्तरतेने भेट दिली व येथील संबंधित नन्सशी बोलून त्यांना उपचारांसाठी च्या मदतीसंबंधी आश्वस्त केले. यावेळी उपशाखाप्रमुख राजेश रासम, राजेश पुरंदरे, ज्ञानेश्वर कारंडे, सौ आश्विनी पाटील, शैलेश खोपडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.