CoronaVirus Lockdown News: मुंबईत आज, उद्या 100 टक्के लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:28 AM2021-04-10T02:28:03+5:302021-04-10T02:28:32+5:30

कठोर निर्बंधांचे पालन करण्याचे महापालिकेचे आवाहन

CoronaVirus Lockdown News: 100 percent lockdown in Mumbai today, tomorrow | CoronaVirus Lockdown News: मुंबईत आज, उद्या 100 टक्के लॉकडाऊन

CoronaVirus Lockdown News: मुंबईत आज, उद्या 100 टक्के लॉकडाऊन

Next

मुंबई : आजच्या शनिवारी, रविवारी मुंबईत १०० टक्के लॉकडाऊन लावला जाणार असून, या काळात केवळ जीवनाश्यक वस्तूंची सेवाच सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी मुंबईकरांनी कठोर निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले. तर लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या जेवणाची तारांबळ उडू नये म्हणून हॉटेलच्या घरपोच जेवणासाठी अगोदरच ऑर्डर द्यावी लागणार आहे. दुसरीकडे शनिवारसह रविवारच्या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीपासून झाली असली तरी बहुतांश ठिकाणी गर्दी कायम असण्यासह काही किरकोळ दुकानेदेखील सुरू असल्याचे चित्र होते.

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्यक्षात मुंबईत सगळीकडे कठोर निर्बंध पाळले जात नाहीत. काही मोठ्या बाजारपेठ सोडल्या तर छोट्या बाजारपेठा सकाळ आणि संध्याकाळी सुरू असतात. दादरसारखी गर्दीची ठिकाणे मात्र बंद असून, इतर परिसरात दुकानाचे शटर अर्धे बंद करून व्यवहार केले जात आहेत.

दरम्यान निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असे सरकारने म्हटले आहे. आता सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच आहे. 

यावर परिस्थिती अवलंबून 
खासगी कार्यालये,चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद आहेत. शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळ असा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला असून, मुंबईकर कसा प्रतिसाद देतात? यावरच कोरोनाचे चित्र अवलंबून आहे.   

Web Title: CoronaVirus Lockdown News: 100 percent lockdown in Mumbai today, tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.