Join us

Coronavirus, Lockdown News: रो-रो सेवेतून ४४१ ट्रकमधून अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:04 AM

आतापर्यंत १९ फेऱ्या। कोकण रेल्वेला मिळाले ५४ लाखांचे उत्पन्न

मुंबई : लॉकडाउनमुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी मालगाडी, पार्सल गाडीची सेवा सुरु आहे. तर, कोकण रेल्वे मार्गावरून रो-रो सेवा सुरू आहे. या सेवेतून ४४१ ट्रकमधून अत्यावश्यक सामग्रीची वाहतूककेली आहे. यातून कोकण रेल्वेला ५४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेनंतर कोकण रेल्वेची सेवा सुरू आहे. कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेद्वारे १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत तब्बल ४४१ ट्रकने अत्यावश्यक मालाची वाहतूक केली आहे. यामध्ये धान्य, फळे, भाजीपाला, ड्रायफूट, दैनंदिन जीवनात आवश्यक विविध गोष्टींचा समावेश आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरू असणारी रो-रो सेवा सध्या कोलाड ते वेर्णा, कोलाड ते सुरतकल आणि वेर्णा ते सुरतकल या मार्गावर सुरू आहे.

आतापर्यंत १९ फेºया रो-रो सेवेच्या झाल्या आहेत. एका फेरीमध्ये ४० ट्रकची वाहतूक केली जात आहे.ही सर्व वाहतूक कमी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाचे सर्व नियम पाळून तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवून केली जात आहे. यासह कोकण रेल्वेच्या काही विशेष पार्सल ट्रेन, मालगाडी धावत आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचा अधिकाºयांनी दिली.सेवेत तत्परआम्ही प्रवासी सेवेसाठी तत्पर आहोत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात पार्सल गाडी, मालगाडी, आणि रो-रो सेवा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा होत आहे. - एल. के. वर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या