गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.पुन्हा पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. पण लॉकडाऊनमध्ये मोठे नुकसान झाले आता कुठे सावरत आहे. त्यामुळे निर्बंध आणखी कडक करा पण लॉकडाऊन करू नका, अशी भूमिका हॉटेल संघटना आणि व्यापाऱ्यांनी मांडली आहे.
हॉटेल व रेस्टॉरंट्सवर वेळेचे निर्बंध आल्याने आता पुन्हा एकदा व्यवसायाला झळ बसण्याची चिंता व्यक्त करण्यात येते आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. भविष्यातील लॉकडाऊन या क्षेत्राचा घास घेईल, अशी भीती हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने व्यक्त केली असून शासनाने व्यवहारिक विचार करावा, असे आवाहन करण्यात आले.
मॉल, शॉपिंग सेंटर्स, किराणा दुकाने, सार्वजनिक वाहतूक अगदी विमानतळांच्या तुलनेतही हॉटेल व रेस्टॉरंट सुरक्षित जागा आहे. येथे जागेचे व्यवस्थापन शक्य आहे. दरवेळी एन्ट्री व एक्झिट ठिकाणी व्यक्तींची देखरेख असते. कर्मचारी वर्ग सर्व ती काटेकोर काळजी घेत असतो. - शेरी भाटिया, अध्यक्ष, एचआरएडब्ल्यूआय
ट्रिटमेंटवर हवा भरमागील वर्षी लॉकडाऊनमुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. भविष्यातील लॉकडाऊन या क्षेत्राचा घास घेईल, अशी भीती हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने व्यक्त केली आहे.
उद्योजकांचा विरोधकोरोनाचा वेगाने प्रसार होणाऱ्या मराठवाड्यातील परभणी, जालना, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीची उपाययोजना करण्यात आली. मात्र, तरीही रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाहीय. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नसून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय कडक करणे तसेच सामान्य जनतेने काटेकोरपणे खबरदारीचे उपाय करणे गरजेचे झाल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे हजारो कामगार हे आपापल्या राज्यात म्हणजे मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश तसेच बिहारमध्ये गेले होते. त्यांना अधिक वेतनाची हमी देऊन पुन्हा बोलावण्यात आले आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागल्यास त्यांच्यावर उपासमारीची आणि उद्योग बंद पडण्याची भीती आहे.- घनश्याम गोयल, अध्यक्ष स्टील असोसिएशन, जालना