Join us

Coronavirus, Lockdown News: ३ मे नंतर मुंबई-पुण्यातील लॉकडाऊनचं काय होणार? शरद पवारांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:15 PM

मे महिन्यात बँकांना ९ दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे घाईनं सगळ्यांनी बँकात जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. इतर दिवस बँका उघड्या आहेत.

ठळक मुद्दे३ तारखेला लॉकडाऊन उठवण्याबाबत सरकार निर्णय घेईल लॉकडाऊन उठवल्यानंतर घाईनं लोकांनी गर्दी करु नयेसोशल डिस्टेंसिंगचं पालन गरजेचे आहे, सरकारच्या सूचनांचे पालन करावं

मुंबई – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामं ठप्प पडली आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजारांपर्यंत पोहचला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे ३ मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

याबाबत शरद पवारांनी राज्यातील जनतेशी संवाद साधताना संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, ३ तारखेला लॉकडाऊन उठवण्याची निर्णय घेतल्यानंतर काही मार्गदर्शक सूचना सरकारकडून येतील. कदाचित मुंबई-पुणे यांच्याबाबत वेगळा निर्णय घेतला जाईल अशीही शक्यता आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर लगेच गर्दी करण्याची गरज नाही. नेहमीसारखं वातावरण नाही. शासनाकडून ज्या सूचना येतील त्या पाळण्याची खबरदारी घेतली पाहिजे.

त्याचसोबत मे महिन्यात बँकांना ९ दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे घाईनं सगळ्यांनी बँकात जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. इतर दिवस बँका उघड्या आहेत. त्यामुळे बँकेने जो कालावधी दिला आहे त्याठिकाणी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करुन काम करा, बँका, भाजी घेण्यासाठी, किराणा माल घेण्यासाठी गर्दी करु नये. या लोकांना सहकार्य करा. पोलिसांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनेने वेदना होतात. ते स्वत:च्या जीवावर उदार होऊन आपल्या सेवेसाठी काम करत आहे. त्यांना सहकार्य करा असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

कोरोनानंतर आर्थिक फटका बसणार

कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. गेल्या ४० दिवसांपासून कारखाने, व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटींची तूट होईल असं दिसून येतं. म्हणजे एकूण महसूलाच्या ४० टक्के तूट राज्यात होणार आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना याबाबत पत्र पाठवून कल्पना दिली. कोरोना संकट देशाच्या सर्वच भागात आहे. केंद्र आणि राज्याने एकत्र बसून आर्थिक प्रश्नावर मार्ग काढण्याची नीती ठरवली पाहिजे. राज्याला वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत कशी करता येईल यासाठी केंद्राला प्रस्ताव दिला आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत राज्यातील शेती व्यवसायावरही परिणाम झाला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज त्याची पर्नरचना केली पाहिजे. हफ्ते लांबवले पाहिजे, व्याजदरात सूट दिली पाहिजे. पीकदरातील व्याजदर शून्यावर आणला पाहिजे. त्यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहेत. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रांना पुरक आर्थिक निर्णय घेतले पाहिजेत असंही त्यांनी सांगितले.

तसेच कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर हजारो लोक बेरोजगार होतील याची चिंता आहे. अनेकांना नोकरीवरुन काढण्यात येईल असं दिसतं. महामारीतून बाहेर पडल्यानंतर मनुष्यबळ लागेल त्याचाही विचार करावा लागेल. परराज्यातील लोक पुन्हा त्यांच्या राज्यात परतले आहेत. अनेक राज्यात कामगारांनी स्थलांतरण केलं आहे त्यामुळे बेरोजगारी आणि मनुष्यबळ ही समस्या उद्भावण्याची शक्यता असल्याचं शरद पवारांनी म्हणाले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?; उद्धव ठाकरे आमदार झाले अन् मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले तर...

१५ हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकाराची मोठी योजना

कोरोनानंतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला

...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसशरद पवार