Coronavirus, Lockdown News: कोरोनानंतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:03 PM2020-04-30T12:03:42+5:302020-04-30T12:12:37+5:30

Coronavirus, Lockdown News: कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. गेल्या ४० दिवसांपासून कारखाने, व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.

Coronavirus, Lockdown News: will face a unemployment issue after Corona; Sharad Pawar expressed concern pnm | Coronavirus, Lockdown News: कोरोनानंतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Coronavirus, Lockdown News: कोरोनानंतर ‘या’ गंभीर समस्येला तोंड द्यावं लागेल; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Next
ठळक मुद्देआरोग्य क्षेत्रातील कर्मचारी जीवाचा धोका पत्करुन रुग्णांची सेवा करत आहेतकेंद्र आणि राज्याने एकत्र बसून आर्थिक प्रश्नावर मार्ग काढण्याची नीती ठरवली पाहिजेशेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रांना पुरक आर्थिक निर्णय घेतले पाहिजेत

मुंबई - महाराष्ट्रात ९९१५ कोरोनाग्रस्त आहेत तर ४३२ रुग्णांचा मृत्यू झाला, भारताचा विचार करतो त्यावेळेला मुंबई, पुणे, जळगाव, मालेगाव, औरंगाबाद याठिकाणी रुग्णांची सख्या जास्त आहे. मुंबईत दाटवस्तीचं परिसर आहेत, लहान घरं आहेत, छोट्या घरात लोक राहतात. त्यामुळे याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने याठिकाणी अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत. सर्वच कोरोनाचे रुग्ण आहेत असं नाही तर ८० टक्क्यापेक्षा अधिक इतर आजाराचे रुग्ण आहेत. परंतु महापालिका आणि प्रशासन उत्तमरित्या काम करत आहेत असं शरद पवारांनी सांगितले.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. गेल्या ४० दिवसांपासून कारखाने, व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटींची तूट होईल असं दिसून येतं. म्हणजे एकूण महसूलाच्या ४० टक्के तूट राज्यात होणार आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना याबाबत पत्र पाठवून कल्पना दिली. कोरोना संकट देशाच्या सर्वच भागात आहे. केंद्र आणि राज्याने एकत्र बसून आर्थिक प्रश्नावर मार्ग काढण्याची नीती ठरवली पाहिजे. राज्याला वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक मदत कशी करता येईल यासाठी केंद्राला प्रस्ताव दिला आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत राज्यातील शेती व्यवसायावरही परिणाम झाला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज त्याची पर्नरचना केली पाहिजे. हफ्ते लांबवले पाहिजे, व्याजदरात सूट दिली पाहिजे. पीकदरातील व्याजदर शून्यावर आणला पाहिजे. त्यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहेत. शेती, उद्योग, व्यापार या सगळ्या क्षेत्रांना पुरक आर्थिक निर्णय घेतले पाहिजेत असंही त्यांनी सांगितले.

तसेच कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर हजारो लोक बेरोजगार होतील याची चिंता आहे. अनेकांना नोकरीवरुन काढण्यात येईल असं दिसतं. महामारीतून बाहेर पडल्यानंतर मनुष्यबळ लागेल त्याचाही विचार करावा लागेल. परराज्यातील लोक पुन्हा त्यांच्या राज्यात परतले आहेत. अनेक राज्यात कामगारांनी स्थलांतरण केलं आहे त्यामुळे बेरोजगारी आणि मनुष्यबळ ही समस्या उद्भावण्याची शक्यता असल्याचं शरद पवारांनी सांगितले.

पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शासन

आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी जीवाचा धोका पत्करुन रुग्णांची सेवा करत आहेत. पोलीस रात्रंदिवस कायदा सुव्यवस्था सांभाळत आहेत अशावेळी डॉक्टर, पोलिसांवर होणारे हल्ले वाढणार असतील तर त्यांचे मनोबल खच्चीकरण होईल. लोकांनीही संयमाने त्यांना सहकार्य करायला हवं. पोलिसांवर हल्ले वाढत असतील त्याबाबत कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली आहे. त्याचे परिणाम आगामी काळात पाहायला मिळतील असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

परराज्यात अडकलेल्यांना राज्यात आणण्याचे प्रयत्न

संकटात अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे सरसावलेत त्याचा आनंद आहे. पंजाब, कोलकात्ता, राजस्थान अशा देशातील अन्य भागात अडकलेल्या लोकांना परत राज्यात पाठवण्याचा विचार केंद्राने केला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण राज्याच्या बाहेर अडकलेलत त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुविधा केली आहे. यासाठी अभय यावळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना ०२२-२२०२७०९९० तसेच ९८२११०७५६५ या नंबरवर फोन करण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं.

पाहा व्हिडीओ

 

Web Title: Coronavirus, Lockdown News: will face a unemployment issue after Corona; Sharad Pawar expressed concern pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.