मुंबई : अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण हळूहळू पुनश्च हरिओम करीत आहोत; पण अजून धोका टळलेला नाही. त्यामुळे राज्यात ३० जून नंतरही लॉकडाऊन कायम राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी काही निर्बंधही शिथिल केले जातील, असे संकेतही त्यांनी दिले.
रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. पण आता काही धोका नाही असे समजून भ्रमात राहू नका. तसं वागलात तर कोरोना आवासून उभा आहे. तरुणदेखील संक्रमित होत आहेत. ८० टक्के लोकांना लक्षणे दिसत नाहीत. गर्दी वाढली आणि केसेस वाढल्या तर पहिल्यासारखा लॉकडाऊन करण्याची गरज पडू शकते, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. तेव्हा पुन्हा लॉकडाऊन करायचा का हे तुम्ही ठरवा, ते मी तुमच्यावर सोपवतो. ५५ ते ६० वर्षे वयावरील अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देण्यासाठी पुढे यावे त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल असे ते म्हणाले. पावसाळ्यात डेंग्यु, मलेरिया, लिप्टो यासारखे आजार डोके वर काढतात हे लक्षात घेऊन नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छता बाळगून कुठेही पाणी साठू देऊ नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.प्लाझ्मा दान करण्याचे आवाहनमहाराष्ट्र औषधोपचार आणि सुविधा देण्यात कुठेही मागे नसून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाज्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील. त्यासाठी पुढे या, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.ती औषधे मोफत देणाररेमडेमीसीवर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे आपण वापरतच आहोत. याचा पुरवठा सुरळित झाला की कुठेही तुटवडा पडू देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.विठुरायाला साकडेआषाढी वारीचा सोहळा यावेळी नाईलाज म्हणून संयम दाखवत साजरा केला जात असतांना वारकऱ्यांचा, राज्यातील विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून आपण आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विठुरायाच्या चरणी मी कोरोनामुक्त राज्याचे साकडे घालणार आणि नक्कीच चमत्कार घडेल.गणेशमूर्ती ४ फूट उंचीचीसर्व गणेशमंडळांना ४ फूट ऊंचीपर्यंतची मूर्ती यावर्षी स्थापित करण्यास सांगितले असून त्यांनी ते मान्य केले आहे. गणेश आगमन आणि विसर्जनाची मिरणवूक काढता येणार नाही. मग उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावर चर्चा करून फक्त परंपरा कशी जपता येईल यादृष्टीने लवकरच निर्णय कळवू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.