मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ०६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ३६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.
राज्यात सध्या ३० हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात २,३१,००९ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर १३३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०४,२०,५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,81, 677 (10.89टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात ४२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२४,८२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५०९८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर ११५४ दिवसांवर गेला आहे.