मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार २१९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ३१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे.
राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ८२८१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (१०), नंदूरबार (२), धुळे (८), जालना (३७), परभणी (५३), हिंगोली (१८), नांदेड (१४), अमरावती (९६), अकोला (२७), वाशिम (०५), बुलढाणा (१४), यवतमाळ (०८), नागपूर (७०), वर्धा (४), भंडारा (२), गोंदिया (३), गडचिरोली (१३ ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १००च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,०५,४६,५७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,८३,८९६(१०.८७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,३२,२६१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १,१२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.