Join us

मुंबईत सुमारे पाच लाख होम क्वारंटाइन, ८० टक्के लक्षणविरहित, रुग्णांमध्ये १५ दिवसांत १३० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:16 AM

Coronavirus in Maharashtra : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. अशा रुग्णांना शक्यतो होम क्वारंटाइन केले जात असल्याने गेल्या १५ दिवसांत घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

- शेफाली परब - पंडित मुंबई : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. अशा रुग्णांना शक्यतो होम क्वारंटाइन केले जात असल्याने गेल्या १५ दिवसांत घरातच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गुरुवारपर्यंत ही संख्या १३० टक्क्यांनी वाढून चार लाख ८७ हजार ९६४ वर पोहोचली आहे. यामध्ये कोरोनाबाधित व संशयित रुग्णांचाही समावेश आहे.कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने जानेवारी महिन्यात होम क्वारंटाइन रुग्णांची संख्या ७० हजारपर्यंत कमी झाली होती.मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्यापंधरवड्यात कोरोनाचा प्रसारपुन्हा सुरू झाला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने फेब्रुवारीअखेरीस  ९६ हजार लोकं गृहविलगीकरणात होते. १५ मार्चपर्यंत ही संख्या दोन लाख ११ हजार १०१ वर पोहोचली. तर ३१ मार्चपर्यंत यामध्ये दुप्पट वाढ होऊन चार लाख ८७ लोकं ९६४ सध्या होम क्वारंटाइन आहेत. मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ३१ मार्च २०२१ पर्यंत ४८ लाख २१ हजार ६३७ नागरिकांनी होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. गेल्या दोन आठवड्यांत बाधित रुग्णांची दररोजची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. सद्यस्थितीत ४५ हजारांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत.  

खाटा कमी पडत असल्याने लक्षणेविरहित घरीचnलक्षणे नसलेले रुग्णही रुग्णालयात दाखल होत असल्याने खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे लक्षणविरहित, सौम्य लक्षणे असलेले, सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसल्यास त्यांना होम क्वारंटाइनची परवानगी देण्यात आली आहे. nसंबंधित रुग्णाच्या फॅमेली डॉक्टरशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. तसेच स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र शौचालय असणे बंधनकारक आहे. मास्क आणि ग्लोव्हज वापरणे, ऑक्सीमीटरच्या मदतीने दैनंदिन तपासणी करुन त्यांची नोंद ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. याद्वारे रूग्ण संख्या कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई