Join us

Coronavirus : कोरोना आपत्तीसाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 3:12 PM

Coronavirus : बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेली रोगराई नियंत्रण करण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटी इतका निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाधित जिल्ह्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी 15 कोटी, पुणे विभागासाठी 10 कोटी, नागपूर विभागासाठी 5 कोटी, अमरावतीसाठी 5 कोटी, औरंगाबादसाठी 5 कोटी, नाशिकसाठी 5 कोटी याप्रमाणे एकूण 45 कोटीचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ४५ कोटी विभागीय आयुक्तांना वितरीत करण्‍यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : उत्तर कोरियात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, किम जोंग उन यांचा अजब दावा

Coronavirus: बापरे! ...तर कोरोनामुळे अमेरिका, ब्रिटनमध्ये 27 लाख लोकांचा मृत्यू होणार?

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईभारत