मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यू वाढीचा आलेख कायम असून दिवसभरात ६६ हजार १५९ रुग्णांचे निदान झाले असून ७७१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. तर गुरुवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ६८ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या ६ लाख ७० हजार ३०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्के असून मृत्यूदर १.५ टक्क्यांवर स्थिरावला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६८ लाख १६ हजार ७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.. राज्यात एकूण ४५ लाख ३९ हजार ५५३ कोरोनाबाधित असून आतापर्यंत ६७ हजार ९८५ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.
दिवसभरात नोंद झालेल्या ७७१ मृत्यूंमध्ये मुंबई ८२, ठाणे २, ठाणे मनपा १५, कल्याण डोंबिवली मनपा १७, उल्हासनगर मनपा ७, मीरा भाईंदर मनपा ६, वसई विरार मनपा २, रायगड २, पनवेल मनपा ११, नाशिक २०, नाशिक मनपा १५, अहमदनगर २४, अहमदनगर मनपा १४, जळगाव १३, जळगाव मनपा १७, नंदुरबार २६, पुणे ३६, पुणे मनपा ९४, पिंपरी चिंचवड मनपा १६, सोलापूर ९, सोलापूर मनपा २७, सातारा ३२, कोल्हापूर १४, कोल्हापूर मनपा ५, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी ३, औरंगाबाद ९, औरंगाबाद मनपा १८, जालना १८, हिंगोली ५, परभणी ३, परभणी मनपा ४, लातूर २, लातूर मनपा २, उस्मानाबाद ७, बीड १६, नांदेड ६, नांदेड मनपा ५, अकोला मनपा १, वाशिम १५, नागपूर २३, नागपूर मनपा ४२, वर्धा ८, भंडारा १७, चंद्रपूर मनपा ५ इ. रुग्णांचा समावेश आहे.